यावल, जि.जळगाव : तालुक्यातील पिळोदा येथे डेंग्यूसदृश आजाराचे पाच रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आढळून आलेल्या रुणाच्या पांढऱ्या पेशी कमी होऊन तापाने फणफणले असून ते बाहेरगावी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, साकळीच्या प्राथमिक आरोग्य विभागाच्या पथकाने पिळोदा गावात जाऊन संबंधित आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनास सूचना दिल्या आहेत, तर घरोघरी जाऊन पाण्याच्या साठ्यांची तपासणी करून ग्रामस्थांनाही आजाराबाबत सूचना केल्या आहेत.याबाबत वृत्त असे की, येथून जवळच असलेल्या पिळोदा येथे गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराने पाच रूग्ण फणफणले आहेत.त्यात एका महिलेसह पाच जणांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांच्या पांढºया पेशी कमी झालेल्या आहेत. ताप येणे, हातपाय दुखणे अशी लक्षणे दिसून आल्याने त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संबंधित आजाराबाबत भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या आजाराची माहिती मिळताच साकळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक पी.टी.ढाके, एस.पी.पारधी, आरोग्यसेवक के.पी.तायडे, एस.के.शिंदे, एस.ए.शेख यांच्या पथकाने गावात घरोघर जाऊन ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी करून पाण्याचे साठे रिकामे केले.तसेच गावातील गटारांची साफसफाई करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या. सरपंच गिरधर पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी गावातील या आजाराच्या परिस्थिती लक्ष ठेऊन आहेत. सध्या या आजारा बाबत परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.शरीरातील पांढºया पेशी कमी होणे या आजाराबाबतचे चार ते पाच रूग्ण आढळून आले आहेत. गावात डासांचा फैलाव होऊ नये म्हणून ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीला सूचना केलेल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.-डॉ.सागर पाटील, वैद्यकीय अधिकारी, साकळी, ता.यावलगावात सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबिवली जात आहे. पाण्याची टाकी टी.सी.एल. पावडरने धुवून घेतली आहे. एक दिवस कोरडा पाळला जात असून, गावात गावातील गटारीवर औषधांची फवारणी केली आहे.- गिरधर बाबूराव पाटील, सरपंच, पिळोदा, ता.यावल
यावल तालुक्यातील पिळोदा येथे डेंग्यूसदृश आजाराची पाच जणांना लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 6:30 PM
यावल तालुक्यातील पिळोदा येथे डेंग्यूसदृश आजाराचे पाच रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देखासगी रुग्णालयात उपचार सुरू वैद्यकीय पथकाने घरोघरी जाऊन केली तपासणी