शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

वेगवेगळ्या घटनांमध्ये तालुक्यात पाच जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:53 PM

जळगाव : शहर व तालुक्यात वेगवेगळ््या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुट्टीसाठी जळगाव येथे घरी येणारा बॅँक कर्मचारी ...

जळगाव : शहर व तालुक्यात वेगवेगळ््या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सुट्टीसाठी जळगाव येथे घरी येणारा बॅँक कर्मचारी अपघातात ठार होण्यासह पाथरी येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शेतातून घरी येणारी महिला ठार झाली. तसेच शहरातील राकेश नगरात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्याचा स्नानगृहात अचानक मृत्यू झाला. आणखी एका घटनेत नंदगाव येथे विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू झाला तर उंदीर मारण्याच्या गोळ्या खाल्ल्याने नांदेड, ता.धरणगाव येथीलतरुणाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.हातेड, ता.चोपडा येथून दुचाकीने जळगावला घरी येत असलेल्या किशोर शिवाजी ठाकूर (३४, रा. कोळी पेठ, जळगाव) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते ठार झाले. विजेचा धक्का लागून ममता बलदेव पाटील (१९) या आयटीआयच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर बाथरुममध्ये मनिष सुरेश जावरे (भोई, १८) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने लताबाई सुरेश धनगर (५०) ही महिला ठार झाली तर उंदीर मारण्याच्या गोळ्या खाल्ल्याने सुरेंद्र धनराज खैरनार या तरुणाचा मृत्यू झाला.पत्नीला सांगितले घरी पोहचतो, मात्र त्यापूर्वीच काळाचा घालाबॅँकेला रविवारची सुटी असल्याने हातेड, ता.चोपडा येथून दुचाकीने जळगावला घरी येत असलेल्या किशोर शिवाजी ठाकूर (३४, रा. कोळी पेठ, जळगाव) या तरुण कर्मचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजता ममुराबाद विदगाव दरम्यान घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर ठाकूर हे राममंदिर परिसरातील कोळीपेठ येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. हातेड येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत शिपाई म्हणून नोकरीला होते. तेथेच भाड्याचे घर घेऊन ते एकटेच वास्तव्याला होते. रविवार बॅँकेला सुटी असल्याने ते शनिवारी सायंकाळी ड्युटी संपल्यानंतर दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एस.८९६२) जळगाव यायला निघाले. निघण्यापूर्वी किशोर यांनी सायंकळी साडेसहा वाजता पत्नीला मी जळगावला येण्यासाठी निघालोय...थोड्या वेळात पोहचतोय...असे सांगितले. जळगाव पोहचण्यापूर्वीच ममुराबाद ते विदगाव दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. पत्नीशी फोनवरुन झालेले संभाषण अखेरचे ठरले. रस्त्यावरुन जात असलेल्या एस.टी. बसचालकाला रक्ताच्या थारोळ्यात तरुण दिसला असता चालकाने तत्काळ बसमधून त्याला किनगाव येथील रुग्णालयात हलविले. ठाकूर यांच्याच मोबाईलमधील पत्नीच्या क्रमांकावर फोन करुन अपघाताची माहिती कळविली. यानंतर नातेवाईकांनी किनगाव गाठले. जखमी ठाकूर यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. पोहचण्यापूर्वीच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. किशोर ठाकूर यांच्या पश्चात आई विमलबाई, वडील शिवाजी पोपट ठाकूर तसेच पत्नी सपना, मुलगा सोहम, अडीच वर्षाची मुलगी सिध्दी असा परिवार आहे. दोन्ही बहिणी विवाहित असून त्यांचे किशोर हे एकुलते एक भाऊ होते. किशोरच्या जाण्याने दोन्ही चिमुकल्यांचे पितृछत्र हरविले आहे.नंदगाव येथे विजेच्या धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यूघरात विजेचा धक्का लागून ममता बलदेव पाटील (१९) या आयटीआयच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता नंदगाव, ता.जळगाव येथे घडली. हरतालिकेच्या पूजेसाठी चुलत बहीण बोलवायला आली असता ही घटना उघडकीस आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बलदेव केशव पाटील हे पत्नी वंदना, मुलगा सनीराज व दुसरा मुलगा राज असे सर्व जर रविवारी सकाळीच शेतात गेले होते. ममता ही एकटीच घरी होती. शेजारीच राहणारी चुलत बहीण धनश्री ही हरतालिकेच्या पूजेसाठी ममता हिला बोलवायला घरी गेली असता ममताला विजेचा धक्का बसल्याने ती जमिनीवर कोसळली होती. धनश्रीने ही माहिती तिच्या वडीलांना दिली व तातडीने ममताला गावातील डॉक्टरांकडे नेले असता त्यांनी जळगावला नेण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात आल्यावर वैद्यकिय अधिकाऱ्यांनी ममताला मृत घोषीत केले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ममता ही शासकीय आयटीआयची विद्यार्थिनी होती. मोठा भाऊ राज देखील खासगी आयटीआयला शिक्षण घेत आहे. आई, वडील शेती करतात. ममता लाडाची मुलगी होती. तिच्या मृत्यूच्या घटनेमुळे आई, वडीलांनी प्रचंड आक्रोश केला. त्यांचा हा आक्रोश मन हेलावणारा होता. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.स्नानगृहात विद्यार्थ्याचा मृत्यूघरातील स्नानगृहात मनिष सुरेश जावरे (भोई, १८, रा.राकेश नगर, जाकीर हुसेन कॉलनी) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली. त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. मनिष व त्याची आई शुचिता असे दोघं जण घरी होते. मनिष बाथरुमला गेला, परंतु बराच वेळ झाला तरी तो बाहेर येत नसल्याने आईने पाहिले असता तो बेशुध्दावस्थेत आढळून आला. त्यांनी पुतण्या योगेश व त्याची आई भारती प्रकाश जावरे यांना बोलावले. त्यांच्या मदतीने खासगी दवाखान्यात नेले असता त्यांनी दुसºया दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. तीन दवाखाने फिरविल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मनिष हा बाहेती महाविद्यालयात बारावीला शिक्षण घेत होता. वडील प्रकाश जावरे लेखापाल असून आई गृहीणी आहे. सोमवारी सकाळी १० वाजता राहत्या घरुन मनिषची अंत्ययात्रा निघणार आहे.अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठारशेतातून घरी येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने लताबाई सुरेश धनगर (५०) ही महिला ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाथरी, ता.जळगाव येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. लताबाई धनगर यांचे जवखेडा रस्त्यावर शेत आहे. शनिवारी दिवसभराचे काम आटोपून त्या सायंकाळी साडे सात वाजता जळगावकडे जाणाºया अज्ञात वाहनाने धडक दिली, त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना सरपंच शिरीष पाटील, उपसरपंच निलेश पाटील, माजी सरपंच संतोष नेटके व नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकिय अधिकारी डॉ.विजय कुरकुरे यांनी त्यांना मृत घोषित केले. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे हवालदार शिवाजी चौधरी व शशिकांत पाटील यांनी रविवारी सकाळी पंचनामा केला.उंदीर मारण्याच्या गोळ्या खाल्ल्याने तरुणाचा मृत्यूउंदीर मारण्याच्या गोळ्या खाल्ल्याने सुरेंद्र धनराज खैरनार (२०, रा.नांदेड, ता.धरणगाव) या तरुणाचा रविवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. सुरेंद्र याने शनिवारी दुपारी उंदीर मारण्याच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. उलट्यांचा त्रास होवू लागल्याने नातेवाईकांनी त्याला चोपडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार केल्यानंतर रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरेंद्र हा बारावीत होता. धरणगाव महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता. त्याने गोळ्या का खाल्लया याचे कारण स्पष्ट झालेले नाही. वडील धनराज पुंजू खैरनार मजुरी करतात. भाऊ विशाल शिक्षण घेत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव