शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पाच क्विंटल प्लास्टीक कॅरीबॅग जप्त; मनपाची मोहीम, दोघांवर दंडात्मक कारवाई

By सुनील पाटील | Published: December 28, 2023 4:25 PM

होलसेल विक्रेत्यांना ५ हजार तर किरकोळ विक्रेते तसेच ग्राहकांच्या हातात कॅरी बॅग आढळली तर पाचशे रुपये दंड आकारला जातो.

जळगाव : ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडी तसेच इतर बंदी असलेल्या प्लास्टीक कॅरीबॅग वापरत असाल तर तुम्हाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, कारण महापालिकेने गुरुवारपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्याच दिवशी विठ्ठल पेठ व का.ऊ.शाळेजवळून पाच क्विंटल कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या असून किशोर एकनाथ पाटील (रा.विठ्ठल पेठ, जळगांव) व राहूल सिंग (रा.का.ऊ.कोल्हे शाळा परिसर) या दोघांना प्रत्येकी पाच हजाराचा दंड आकारण्यात आला आहे.

महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त उदय पाटील यांच्या पथकातील मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, जितेंद्र किरंगे, नागेश लोखंडे, रमेश इंगळे, मुकादम दिपक भावसार, वालीदास सोनवणे व शरद पाटील यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत मोहीम राबविली. त्यात किशोर पाटील व राहूल सिंग या दोघांकडे बंदी असलेल्या प्लास्टीक कॅरीबॅगचा साठा आढळून आला. या कॅरीबॅग जप्त करण्यासह दोघांकडून जागेवरच दहा हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

प्लास्टीक कॅरी बॅग आढळली तर असा होतो दंडमहाराष्ट्रात प्लास्टीक कॅरी बॅग उत्पादनासह विक्रीला बंदी आहे. महाराष्ट्र प्लास्टीक पिशव्यांचे (कॅरी बॅग) (उत्पादन व वापर) नियम २००६ चे कलम ८ अन्वये उत्पादनाच्या ठिकाणी कॅरी बॅग आढळल्या तर २५ हजार रुपये, होलसेल विक्रेत्यांना ५ हजार तर किरकोळ विक्रेते तसेच ग्राहकांच्या हातात कॅरी बॅग आढळली तर पाचशे रुपये दंड आकारला जातो.