जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी होणार नाही, असे आदेश असतानाही घाऊक व्यापारी किरकोळ भाजीपाला विक्री करीत असल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या भेटीदरम्यान उघड झाला. या ठिकाणी गर्दी होऊन जमावबंदीचे उल्लंघन झाल्याने पाच भाजीपाला विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासह त्यांचे परवानेदेखील रद्द करण्यात आले.जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीतील काही घाऊक व्यापारी हे नागरीकांना किरकोळ स्वरुपातही भाजीपाला विक्री करीत होते. त्यामुळे गर्दी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे आसाराम दामू बाविस्कर, चंद्रकांत अशोकं पाटील, हबीब खान समशेर खान, सदाशिव वेडू जोशी, हाजी रफिक इसा बागवान या पाच जणांवर गर्दी जमा करीत संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला़ तसेच या पाचही व्यापाऱ्यांचे १४ एप्रिलपर्यंत परवानेदेखील रद्द करण्यात आले आहे.
पाच घाऊक भाजीपाला विक्रेत्यांचे परवाने रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:53 PM