जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जिल्हाभरातूनआलेल्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वाहनांमध्ये ४० वाहने विनापरवानगी झेंडे लावलेले आढळून आल्याने त्याचा खर्च उमेदवारांच्या हिशोबात नोंदविणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.कोणत्याही वाहनांवर राजकीय पक्षाचे चिन्ह, स्टीकर वापरण्यापूर्वी त्यासाठी परवानगी घेणे सक्तीचे केले आहे. त्यात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जिल्हाभरातून आणलेल्या वाहनांवर पक्षाचे ध्वज लावण्यात आले होते. निरीक्षण पथकाला ४० वाहने विनापरवानगी आढळून आले. त्यामुळे या सर्वांचा खर्च उपस्थित आठ उमेदवारांच्या हिशोबात खर्च दाखविण्यात येणार माहिती जळगाव शहर मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी दीपमाला चौरे यांनी दिली.
जळगावात ४० वाहनांवर विनापरवानगी राजकीय पक्षाचे झेंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:56 AM