विजय पाटील / ऑनलाईन लोकमतआडगाव, जि. जळगाव, दि. 3 - उंबरखेडेचे रहिवासी व आडगाव येथील कल्पेश इंजिनीअरिंग वर्कशॉपचे मालक अशोक शिवाजी चव्हाण यांनी झोपडीतून आपल्या व्यवसायाची सुरुवात करत वर्कशॉप र्पयत मजल मारली आहे. एवढेच नाहीतर यांना उत्कृष्ट शेतीपयोगी अवजारे बनविल्याबद्दल त्यांना दोनदा शासानाचा पुरस्कार मिळाला आहे. अतिशय कठीण परिस्थितीतून वर आलेले अशोक चव्हाण यांचा इतिहास पाहिल तर उंबरखेड येथे एका छोटय़ाशा झोपडीत वडील शिवाजी चव्हाण यांनी लोहाराचा व्यवसाय सुरू केला. त्यांना तीन मुले व दोन मुली. अत्पल्प मजुरीवर एवढय़ा मोठा कुटुंबाचा रहाटगाडा चालवायचा कसा? असा प्रश्न शिवाजी चव्हाण यांच्यासमोर ठाकला होता. मुलगा अशोक चव्हाण यांनी आपल्या आई-वडिलांना व्यवसायात मदत करून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उंबरखेडे येथे पूर्ण केले. पुढे त्यांनी आपला व्यवसाय वाढावा व भावांच्या हातालाही काम मिळावे म्हणून गावातील काही नागरिकांच्या सहकार्याने आडगावजवळ साधारणत: 20 आर इतकी जमीन घेतली. सदर जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा उंबरखेडच्या सहकार्याने अत्याधुनिक यंत्रासह भले मोठे वर्कशॉप उभारले. त्यात त्यांनी ट्रॅक्टरचे पलटी नांगर व टिलर बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. चव्हाण यांचे नांगर व टिलर तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात शेतक:यांचे पसंतीचे अवजार ठरल्याने मागणी वाढली. यामुळेच त्यांना मागील महिन्यात जळगाव काही वर्षापूर्वी झालेल्या शेतकरी मेळाव्यात राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री एकनाथराव खडसे व विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते पंजाबराव देशमुख राष्ट्रीय कृषी रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नंतर पुन्हा 26 जानेवारी 2016 रोजी मालेगाव येथील एका कार्यक्रमात कृषी अवजारात विशेष कामगिरी केल्याबद्दल सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी अशोक चव्हाण यांचे कुटुंब, उंबरखेड व आडगाव येथील नागरिक उपस्थित होते.
झोपडीतून घेतली वर्कशॉर्पयत भरारी
By admin | Published: June 03, 2017 2:23 PM