अशोक परदेशी । लोकमत न्यूज नेटवर्कभडगाव : तालुक्यातील निंभोरा गावाच्या महादेव बर्डीच्या वस्तीलगतच्या तलावात कमळांचा मळा फुललला आहे. तालुक्यात या एकाच ठिकाणी अशी कमळांची फुले मोठय़ा प्रमाणावर फुलताना दिसतात. पावासाळ्यादरम्यान अधिक फुले असतात. यामुळे या मनोहारी तलावाकडे सर्वाचेच लक्ष वेधले जात आहे.निंभोरा गावापासून 2 कि.मी.वर महादेव बर्डीची वस्ती आहे. ही वस्ती उजव्या कालव्यालगतच वसली आहे. या ठिकाणी मोलमजुरी, शेतीमजुरी करणारे गरीब कुटुंबे राहतात. येथे महादेवाचे मंदिरही बांधले आहे. या मंदिराच्या परिसरात कालव्याला लागूनच काही वर्षापासूनच छोटा तलाव आहे. गावाचे पाणीही या छोटय़ा कालव्यात तलावात येते. येथे चांगला पाणीसाठा आहे. या तलावाच्या चिखलातून अनेक कमळ उमलताना दिसत आहेत. तालुक्यात फक्त निंभो:याच्या महादेव बर्डी वस्तीच्या तलावातूनच एकमेव कमळाचा मळा नजरेस पडतो.
महादेव बर्डी तलावात फुलतो कमळांचा मळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 2:58 PM
निंभोरा गावापासून 2 कि.मी.वर महादेव बर्डीची वस्ती
ठळक मुद्देमनोहारी तलावाकडे सर्वाचेच लक्ष वेधले जात आहे.वर्षभर असतात फुले