आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ३ - चाऱ्याच्या कमतरतेसह पाणी टंचाईच्या तीव्र झळा मुक्या जनावरांना बसू लागल्या आहेत. चाराव पाण्याअभावी पशूपालक आपली गुरे विक्रीला काढत आहे तर दुसरीकडे याच कारणाने खरेदीदारही मिळत नसल्याचे विदारक चित्र गुरांच्या बाजारात आहे. नाईलाजास्तव पशूपालक आपले दुभती जनावरे विक्रीला काढत आहे. त्यांना भाव मिळत नाही तर भाकड जनावरे कोणी घेण्यास तयार नाही.वाढत्या उन्हासोबतच पाणी टंचाईच्याही झळा वाढू लागल्याने पिण्याचे पाणी मिळणे कठीण असताना गुरांनाही पाणी पुरविणे पशूपालकांसाठी कठीण होत आहे. अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने गुरांना कसे पाणी पुरवावे, असा प्रश्न पशूपालकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे गुरांना पाणीच देता येत नसल्याने ती विकून टाकलेली बरी या विचाराने पशूपालक आपली गुरे थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे.दुप्पट भाव देऊनही चारा मिळेनापाण्यासोबतच चाºयाचीही टंचाई असल्याने चाºयाचे भाव गगनाला भिडले आहेत. तीन हजार रुपये शेकडा पेंडी असलेला दादरचा कडबा सध्या सहा ते साडेसहा हजार रुपये शेकडा विक्री होत आहे. एवढा भाव देऊनही हा चारा मिळत नसल्याचे पशूपालकांनी सांगितले. उसाचा चाराही २८०० ते ३००० रुपये क्ंिवटलवर पोहचला आहे.महिनाभरात पालटले चित्रचारा व पाणी टंचाईमुळे सध्या गुरांच्या बाजारातील उलाढाल ३० ते ३५ टक्क्यांवर आली असल्याचे बाजारात आढळून आले. दर शनिवारी भरणाºया गुरांच्या बाजारात जिल्हाभरातून गुरे विक्रीसाठी येण्यासह खरेदीदारही मोठ्या प्रमाणात येत असतात. गेल्या महिन्यापर्यंत येथे दर शनिवारी साधारण ५० लाखाची उलाढाल होत असे. मात्र सध्या हीच उलाढाल १५ ते १६ लाखांवर आली आहे.दुभत्या जनावरांनाही भाव मिळेनाचारा, पाण्याअभावी पशूपालन करणे कठीण होत असल्याने पशूपालक नाईलाजास्तव आपली दुभती जनावरेही बाजारात विक्रीला आणत आहे. मात्र चारा, पाण्याअभावी खरेदीदारही खरेदी करण्यास धजावत नाही. त्यामुळे गुरांना अत्यंत कमी दरात मागणी होत आहे. ६५ हजारापर्यंत किंमत असलेल्या एका म्हशीला आज केवळ ५५ हजारात विकावे लागल्याचा अनुभव येथे एका विक्रेत्याने सांगितला.चारा, पाणी नसल्याने पशूपालक आपले गुरे बाजारात विक्रीला आणत आहे. मात्र ग्राहकी नसल्याने बाजार थंडावला आहे.- सदाशिव जोशी, गुरांचे व्यापारी.चाºयाचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने पशूपालन करणे कठीण होत आहे. त्यामुळे दुभती जनावरे बाजारात विक्रीला येत असले तरी त्यांना त्या प्रमाणात भाव मिळत नाही व भाकड जनावरे घेण्यास कोणी तयार होत नाही.- विशाल राजपूत, पशूपालक, कुसुंबा
जळगाव जिल्ह्यात चारा व व पाणी टंचाईचा गुरांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2018 7:09 PM
खरेदीदारही मिळत नसल्याने बाजार थंडावला
ठळक मुद्दे दुभत्या जनावरांनाही भाव मिळेनादुप्पट भाव देऊनही चारा मिळेना