आॅनलाईन लोकमतभडगाव,दि.१४ : जिल्हा प्रशासनातर्फे पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात आल्याने भडगाव तालुक्यात ज्वारी, मका, बाजरी, हरभरा यासह बागायतीचा चारा मुबलक प्रमाणात शिल्लक आहे. मात्र मळगाव व पेंडगावातील पशुपालक चाऱ्या अभावी आपल्याकडील पशुधन नातेवाईकांकडे पाठवित असल्याची धक्कादायक स्थिती आहे.भडगाव तालुक्यातुन चारा अमळनेर, धुळे आदि जिल्हयात विकला जात आहे. तर भङगाव तालुक्यात मळगाव, तांदुळवाडी, पेंडगाव, आडळसे, जुवार्डी यासह काही गावांमध्ये रब्बीचा हंगाम पाण्याअभावी न घेता आल्याने चारा टंचाई स्थिती अवघड आहे. पशुमालक इतर भागातुन बैलगाडी, ट्रॅक्टरद्वारे चारा वाहतुक करतांना दिसत आहेत. गिरणा पट्यात ज्वारी, मका, बाजरी, हरभरा पिकाचा पेरा रब्बी हंगामात चांगला होता. त्यामुळे चाºयाचा प्रश्न सुटला आहे.शंभर पेंढीसाठी मोजावे लागतात २ हजार रुपयेतर बाळद, भडगाव, वडगाव, गिरड, अंजनविहीरे यासह काही गावांना दादर पिकामुळे चारा चांगला आकारला आहे. तालुक्यात ज्वारीचा चारा २ हजार रुपए शेकडा, मका चारा कुट्टी ५ हजार रुपए एकरप्रमाणे विक्री केला जात आहे. बाजरीचा चारा, हरभरा कुट्टी चारा विकला जात आहे. सध्या ज्वारी, बाजरी कापणी या महीनाअखेर रानोमाळ चालणार आहे. त्यामुळे चारा विक्री चालुच राहणार आहे.चारा टंचाईमुळे पशुधनाचे स्थलांतरमळगाव, पेंडगाव यासह चारा, पाणी टंचाईमुळे पशुमालक इतर भागातुन चारा विकत तर आणतच आहेत. तर काही पशुमालक उन्हाळयात जनावरे पोसावी म्हणुन तालुक्यात दुसºया गावांना आपल्या नातेवाईकांकडे पाठवित आहेत.
चारा टंचाईमुळे चक्क गुरांना पाठविले जात आहे नातेवाईकांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 7:05 PM
भडगाव तालुक्यातील मळगाव, पेंडगावातील पशुपालकांवर ओढवली नामुष्की
ठळक मुद्देचारा टंचाईमुळे पशुधनाचे स्थलांतरशंभर पेंढीसाठी मोजावे लागतात २ हजार रुपये