आॅनलाईन लोकमत जळगाव, दि.१२- सकाळी थंडी, दिवसभर कडक उन व उकाडा आणि रात्री पाऊस असे विचित्र हवामान गेल्या दोन दिवसांपासून असताना गुरूवारची पहाट मात्र जळगावकरांसाठी फारच आल्हाददायक ठरली. सकाळी उजाडल्यापासून ते साडे आठ वाजेपर्यंत संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पांघरली गेल्याचे चित्र दिसून आले. सकाळी कामानिमित्त तसेच व्यायामासाठी, मार्निंग वॉकला निघालेल्या नागरिकांना, शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांनाही या धुक्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला. सकाळी साडे सहा- सात वाजेच्या सुमारास तर रस्त्यावरील २०-२५ फुटांपलिकडचे दिसणार नाही, इतके दाट धुके होते. हळूहळू त्याचे प्रमाण कमी होत गेले. या धुक्यामुळे कालपर्यंत पावसाळा सुरू असल्याचे चित्र अचानक बदलून हिवाळा सुरू झाला असल्याची जाणीव नागरिकांना झाली. हिल स्टेशनला आल्याचा भास वर्षातील ८ महिने, विशेषत: एप्रिल, मे व जूनमध्ये प्रचंड ऊन आणि उकाडा, उष्म्याला तोंड देणाºया खान्देशवासियांना थंडी स्वागतार्ह वाटते. मात्र धुक्याचे प्रमाण मात्र तुलनेत फारच कमी असते. अगदी पहाटे थोडावेळ धुक्याचे वातावरण अनुभवायला मिळते. मात्र गुरूवारी पूर्ण शहरातच दाट धुके अनुभवायला मिळाले. वातावरणातील हा बदल नागरिकांना मात्र कमालीचा सुखावून गेला. एखाद्या ‘हिल स्टेशन’ला असल्यासारखाही शहरवासीयांना भास झाला.
जळगाव शहराने पांघरली दाट धुक्याची चादर- नागरिकांना बसला आश्चर्याचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 3:39 PM
गुरूवारची पहाट ठरली जळगावकरांसाठी आल्हाददायक
ठळक मुद्देसकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्यांना बसला आश्चर्याचा धक्का२०-२५ फुटांपलिकडचे दिसणार नाही, इतके दाट धुकेहिल स्टेशनला आल्याचा भास