विजयकुमार सैतवाललोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : देशभरातून जमा होणाऱ्या कचऱ्यापासून चटईसह खुर्च्या व इतर प्लास्टिक वस्तू तयार होणाऱ्या जळगावातील प्लास्टिक उद्योगाला कोरोना संसर्गामुळे मोठा फटका बसत असून १५० उद्योगांवर त्याचा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे वर्षभरात रिसायकल मटेरियलच्या भावात मोठी वाढ झाली आहे. जळगावातील या मोठ्या उद्योगासह ऐन खरेदीच्या हंगामात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवसायालादेखील ‘ब्रेक द चेन’ची झळ सहन करावी लागत आहे.
कोरोनाने वर्षभरात विविध उद्योगांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यात प्लास्टिक पुनर्वापर उद्योगही अडचणीत आला आहे. कोरोनामुळे प्लास्टिक कचऱ्याची आवक कमी झाल्याने गेल्या वर्षभरात कच्च्या मालाच्या किमतीमध्ये जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. जळगावात प्लास्टिकचा पुनर्वापर करून चटई, खुर्च्या यासह विविध वस्तू तयार केल्या जातात.कचऱ्यापासून रिसायकल प्लास्टिक ग्रॅन्युएल्स बनविले जाते. मात्र कोरोनामुळे देशाच्या विविध भागातून येणाऱ्या या कचऱ्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. परिणामी वर्षभरापूर्वी २० ते ३५ रुपये प्रतिकिलो असणारे ग्रॅन्युएल्स आता ३५ ते ५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.छत्तीसगड, गुजरात, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, केरळ या भागातून जळगावात प्लास्टिक कचरा येतो. त्यावर प्रक्रिया करून विशिष्ट प्रकारचे दाणे तयार केले जातात. कोरोनाच्या संकटात मालाची टंचाई व भाववाढीची झळ सहन करत आहे.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारही थंडn वर्षातील तीन महिनेच खरेदीचा हंगाम असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधामुळे उलाढाल ठप्प झाली आहे. n खरेदी-विक्रीच्या या हंगामासाठी व्यावसायिकांनी खरेदी करून ठेवलेला जवळपास ४०० कोटींचा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा माल दुकानात तसाच पडून आहे. n जळगाव जिल्ह्यातील तापमान पाहता फेब्रुवारी महिन्यापासूनच येथे उकाडा सुरू होतो. त्यामुळे व्यावसायिकांनी आपल्या दुकानांमध्ये एसी, फ्रीज, कुलर अशा विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करून ठेवली. मार्च-एप्रिल महिन्यात या वस्तूंना चांगलीच मागणी वाढते. त्यादृष्टीने व्यावसायिकांनीही नियोजन केले असले खरेदी केलेला माल तसाच ठेवण्याशिवाय व्यावसायिकांकडे पर्याय राहिला नाही.