अजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : खान्देशातील युवकांना लोककला व लोकसंगीताची माहिती व ज्ञान मिळावे यासाठी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठातर्फे येत्या वर्षभरात लोककला अकादमी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या स्थापनेला १५ आॅगस्ट रोजी २७ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने कुलगुरू प्रा.पाटील यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विद्यापीठाकडून वर्षभरात राबविण्यात येणाºया योजना, उपक्रम, स्पर्धा व विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येणाºया विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यापीठाकडून वर्षभरात कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. यासह ‘विद्यापीठ-महाविद्यालये’ आंतरसंवाद कक्षदेखील विद्यापीठाकडून सुरू करण्यात येणार आहे.‘फास्टट्रॅक’ पद्धतीने पुनर्मूल्यांकननिकालात शंका असल्यास फोटोकॉपीचा निकाल जाहीर व्हायला उशीर होत असल्याने अनेकदा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होऊनदेखील पुढील वर्षाला प्रवेश घेता येत नव्हता. मात्र यावर्षी ‘फास्टट्रॅक’ पद्धतीने पुनर्मूल्यांकन करून सुमारे ६०० विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लावण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश घेता येत असल्याचे कुलगुरू म्हणाले.आदिवासी अकादमीत सुरू करणार अभ्यासक्रमनंदुरबार येथे शासनाकडून उमविला २५ एकर जागा प्राप्त झाली आहे. या ठिकाणी आदिवासी अकादमी स्थापन केली जाणार आहे. त्या अकादमीद्वारे नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन व एकात्मिक कृषी व्यवसाय व्यवस्थापन हे पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.याशिवाय मानव विकास केंद्र, कौशल्य आणि समूह शिक्षण केंद्र, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन व उद्योजकता केंद्र, सुशासन आणि आदिवासी धोरण संशोधन केंद्र, संस्कृती, क्रीडा केंद्र व आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.विद्यापीठाकडून यावर्षी जिल्हास्तरावर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांसाठी जिल्हास्तरीय युवारंग महोत्सव घेण्यात येईल. या जिल्हास्तरीय महोत्सवातून निवडक संघाची निवड खान्देशस्तरीय युवारंग महोत्सवासाठी करण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. यासह युवारंगच्या धर्तीवर क्रीडा महोत्सवदेखील घेण्यात येणार असून, या महोत्सवाद्वारे खान्देशातून प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेतला जाणार असल्याचेही कुलगुरूंनी सांगितले.गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली उमवि-जळगाव बससेवा गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आली. दररोज शेकडो विद्यार्थी या बससेवेचा लाभ घेत आहेत. या वर्षापासून उमविमध्ये शिक्षण घेऊन ये-जा करणाºया विद्यार्थ्यांना बसपाससाठी विद्यापीठाकडून ५० टक्के रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून दिली जाणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.
लोककला अकादमी स्थापन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:04 AM
प्रा.पी.पी.पाटील : विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र स्थापन करण्याला प्राथमिकता
ठळक मुद्देउमविच्या स्थापनेला २७ वर्षे पूर्ण होत आहेत‘लोकमत’ने कुलगुरू पाटील यांच्याशी साधला संवादखान्देशात जिल्हास्तरीय युवारंग महोत्सव होणार