आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ४ - जन्माला आलेला कोणीही भुकेल्या पोटी राहू नये यासाठी शहरातील नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे लवकरच फूड बँक सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारीदेखील सुरू केली असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.गरजंूच्या पोटाला अन्न, अंगावर कपडे मिळण्यासह तळागळापर्यंत शिक्षण पोहचण्यासाठी काम करीत असलेल्या नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाºयांचे चर्चासत्र ‘लोकमत’ कार्यालयात गुरुवारी झाले. या वेळी संस्थापक अध्यक्ष अविनाश जावळे, सचिव शारदा सोनवणे, व्यवस्थापक धीरज जावळे, उपव्यवस्थापक धनंजय सोनवणे, मार्गदर्शक मनोज पाटील, सदस्य महेश शिंपी, अक्षय जैन, शकील अहमद मो. ईस्माईल उपस्थित होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नयेशिक्षणामुळेच प्रत्येकाची प्रगती होऊ शकते, म्हणून शिक्षणावर भर देणाºया प्रतिष्ठानच्यावतीने अनेक शाळांना मदत करण्यासह शैक्षणिक साहित्यही उपलब्ध करून दिले जाते. आतापर्यंत शकुंतला विद्यालय, उजाड कुसुंबा, केकतनिंभोरा (ता. जामनेर) आश्रमशाळेसह शहर व परिसरातील इतर शाळांमध्ये शालेय साहित्यासह क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.३० सदस्यांकडून दररोज ५ रुपये केले जातात गोळाशैक्षणिक मदतीसह गरजूंना कपडे, आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे कामही प्रतिष्ठानच्यावतीने केले जाते. नोकरदार, व्यावसायिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी मिळून एकत्र येत काम करीत असलेल्या प्रतिष्ठानच्यावतीने कोणत्याही मदतीसाठी राजकीय असो की इतर कोणत्याही व्यक्तीकडे मदत मागितली जात नाही, हे विशेष. यासाठी प्रतिष्ठानचे ३० सदस्य दररोज पाच रुपये जमा करून महिन्याकाठी प्रति सदस्य १५० रुपये जमा करतात व कोणत्या भागात मदत करणे गरजेचे आहे, याचे सर्वेक्षण करून त्या भागात जमा झालेल्या पैशातून आवश्यक ती मदत करीत असतात.अनोख्या पद्धतीने वाढदिवसप्रतिष्ठानचे सदस्य आपला वाढदिवसही कोणताही बडेजावपणा न करता गरजूंच्या मदतीसाठी अनोख्या पद्धतीने साजरा करीत असतात. गोरगरीबांना कशाची आवश्यकता आहे, हे पाहून वाढदिवसाच्या खर्चातून गरजूंना मदत केली जाते. यामध्ये अनेकांनी शालेय साहित्याचे वाटपदेखील केले आहे तर काही सदस्यांनी तीन मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेत वाढदिवसाचा खर्च त्यावर केला जात आहे.प्रत्येक सदस्य देणार दोन व्यक्तींचे जेवणसध्या विविध आवश्यक सुविधांची मदत करणारे प्रतिष्ठान आता वर्धापन दिनापासून (आॅगस्ट महिन्यापासून) गरजूंना जेवणाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. यासाठी शहरातील विविध भागात सर्वेक्षण करून त्या ठिकाणी फूड बँक सुरू करणार आहेत. यामध्ये सुरुवातीला प्रत्येक सदस्य दोन व्यक्तींचे जेवण दररोज उपलब्ध करून देणार आहे. त्यापुढील टप्पा म्हणून सदस्य आर्थिक मदत करून जेवण विकत घेणार आहे तसेच विवाह समारंभाच्या ठिकाणी जाऊन शिल्लक जेवण या फूड बँकेत देण्याचे आवाहन करणार आहेत. यामध्ये वयाची अट राहणार असून १० वर्षाआतील बालक व ५५ वर्षांवरील वृद्धांनाच हे जेवण दिले जाईल, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.प्रतिष्ठानच्यावतीने प्रदूषणमुक्त होळी, वृद्धाश्रमात मदत करण्यासह विविध क्षेत्रात कार्य करणाºया महिलांचा गौरव करणे असे अनेक उपक्रम राबवून प्रोत्साहन देण्याचे काम केले जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले.विदेशातून मदतप्रतिष्ठानचे कार्य विदेशातही पोहचले आहे. कार्याने प्रभावित होऊन चोपडा तालुक्यातील रहिवासी असलेल्या व सध्या जर्मनीत स्थायिक असलेल्या आदिती धुप्पड यांनी प्रतिष्ठानला पाच हजारांची मदत पाठविली आहे.
जळगावात गरजूंच्या उदरभरणासाठी लवकरच ‘फूड बँक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 11:54 AM
नि:स्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचा पुढाकार
ठळक मुद्देमनोदय विदेशातून मदत