अमळनेर, जि.जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक कुटुंबांवर उपजीविकेचे मोठे संकट उभे राहिले आहे. यात कोणत्याही समाजाचा सर्वसामान्य आणि मोलमजुरी करणारा माणूस सुटलेला नाही. त्यामुळेच अमळनेर येथील मोहम्मदी ट्रस्ट व इंडियन स्टार ग्रुपने हिंदू आणि मुस्लीम २०० कुटुंबांना अन्नधान्य वाटप करून एकतेचा संदेश दिला.कोरोनाने संपूर्ण जगालाच विळखा घातला आहे. त्यामुळे या महामारीचा सर्वांनाच सामना करावा लागणार आहे. यासाठी सर्व सामाजिक संघटना मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. म्हणूनच अमळनेर येथील गलवाड़े रोड प्रतापनगर परिसरातील मोहम्मदी मशिदीच्या आलेल्या पैशातून शनिवारी मशीद ट्रस्ट व इंडियन स्टार ग्रुपने हिंदू मुस्लीम बंधूच्या घरात जाऊन अन्नधान्य वाटप केले. या वेळी सैयद शौकत अली, सय्यद लियाकत अली, शमशेर पठान, शहाजन अली आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अमळनेरात मशिदीच्या पैशातून केले अन्नदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 7:04 PM
मोहम्मदी ट्रस्ट व इंडियन स्टार ग्रुपने हिंदू आणि मुस्लीम २०० कुटुंबांना अन्नधान्य वाटप करून एकतेचा संदेश दिला.
ठळक मुद्देमोहमदी मशिदीचा पुढाकार२०० हिंदू व मुस्लीम कुटुंबांची केली भोजन व्यवस्थादिला एकतेचा संदेश