गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या, एकवेळ जेवणाची चिंता असलेल्या तसेच बेरोजगारीने जेवणाची व्यवस्था नसलेल्या गोरगरीब जनतेला दररोज गेल्या १५ दिवसांपासून चालता फिरताना प्रवासात अडकलेल्या नागरिकांना दोन घास मायेचे मिळावे या हेतूने बोदवड येथील जैन नवयुवक मंडळाने अन्नछत्र सुरू केले आहे. त्यात ते दोनशेवर गरजूंना अन्नदान करीत आहेत.शहरासोबतच रस्त्याने जे परप्रांतीय नागरिक पायदळ प्रवास करीत आहे, त्यांना रस्त्यावर भेटून आपल्याकडे जेवण आहे की नाही, अशी विचारणा करीत जेवणाचे पाकीट, पाण्याची बाटली देऊन, त्यांना मदत देत आहेत. यासाठी जैन समाजाच्या या तरुणांनी शहरात कोणाकडेही या उपक्रमासाठी मदत मागितली नाही. स्वखर्चाने जैन स्थानकाच्या स्वयंपाक घरात दररोज दोनशे नागरिकांचे जेवण तयार करून त्यांना पाकीट बंद करून ही मदत ते घरपोच देतात. त्याचप्रमाणे ज्या नागरिकांचा कोरोनामुळे रोजगार जाऊन हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यांनाही हे दोन्ही वेळचे जेवण देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.याशिवाय तालुक्यात कोठेही ज्यांना ज्यांना एक वेळच्या जेवणाची व्यवस्था होत नसेल त्यांनी बोदवड येथील जैन बोर्डिंगला माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
बोदवडला जैन युवकांनी सुरू केले अन्नछत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 3:52 PM
बोदवडला जैन युवकांनी अन्नछत्र सुरू केले आहे.
ठळक मुद्देजैन नवयुवक तरुणाचा उपक्रम गोरगरिबांना देत आहे दररोज जेवण