शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मुलीला देहव्यापारास भाग पाडणाऱ्यांना तिघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:45 AM

चोपडा शहराजवळ एका झोपड्यात अल्पवयीन मुलीला देह व्यापारास भाग पाडणाºया तीन आरोपींना न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ठळक मुद्देमुलगी बिहारची रहिवासी सहा जणांची साक्ष ठरली महत्वपूर्ण

चोपडा : शहराच्या हद्दीत बिहारमधील अल्पवयीन मुलीकडून देह व्यापार करवून घेणाºया तीन आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ३ हजार रुपये दंड चोपडा न्यायालयाने ठोठावला.न्यायालयीन सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, २६ मार्च २०१८ रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनला धरणगाव रोडवरील हतनूर कालव्याच्या बाजूला झोपड्यात अल्पवयीन मुलीकडून देह व्यापार करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून, चोपडा पोलिसांनी बनावट ग्राहक व पंच पाठवून धाड टाकली असता तेथे आरोपी सलमा अब्दुल गाजी रा. कलकत्ता, वजीर हाड पश्चिम बंगाल, आकाश अशोक वानखेडे असे व सोबत पीडित बिहार येथील अल्पवयीन मुलगी असे मिळून आले होते. त्यानंतर सहायक फौजदार दत्तात्रय पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला आरोपींविरुद्ध कलम ३,४,५ व ६ नुसार अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अन्वये गुन्हा दाखल झाला होता.सदर गुन्ह्याचा प्रथम तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी केला. नंतर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी करून चोपडा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटला चोपडा न्यायालयात चालला असता एकूण ६ साक्षीदार तपासले . साक्षीदारांची साक्ष व युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश ग.दी. लांडबळे यांनी १४ रोजी तिन्ही आरोपितांना दोषी धरीत विविध कलमान्वये तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.सदर प्रकरणात सरकारी वकील गजानन खिल्लारे यांनी सरकारी पक्षातर्फे भक्कम बाजू मांडली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे व पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला.

टॅग्स :Courtन्यायालय