जळगाव : स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे ४ ते ६ जानेवारी दरम्यान १७व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून तीन दिवस जळगावकरांना जुन्या-नव्या कलावंतांचा संगम असलेल्या संगीत मैफिलीचा आस्वाद घेता येणार आहे. यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवात जपानी कलावंत ताका हिरो अराई हे संतूर वादनाची तार छेडून महोत्सवाचा समारोप करणार आहे.या संदर्भात शनिवारी संध्याकाळी कांताई सभागृहात पत्रकार परिषद होऊन त्यात प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी या विषयी माहिती दिली. या वेळी चांदोरकर यांच्यासह प्रतिष्ठानचे विश्वस्त शरदचंद्र छापेकर, स्टेट बँक आॅफ इंडियाचे उप शाखा व्यवस्थापक अशोक धिवरे, युनियन बँक आॅफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक पी.के. त्रिवेदी, युनियन बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक काशिनाथ पाटील, बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक नितीन रावेरकर, स्टेट बँक आॅफ इंडियाच्या व्यवस्थापक प्रतिभा जाजू हे उपस्थित होते.सात सत्रामध्ये महोत्सवयंदा हा महोत्सव सहा ऐवजी सात सत्रांमध्ये होणार आहे. गेल्या वर्षापासून सुरू केलेल्या प्रात:कालीन मैफलीचे एक सत्र ८ जानेवारी सकाळी सात वाजता महात्मा गांधी उद्यानात होणार आहे. इतर सर्व सत्र बालगंधर्व खुले नाट्यगृहात संध्याकाळी सात ते रात्री १० या वेळेत होणार आहे.उदयोन्मुख कलावंताच्या गायनाने महोत्सवास सुरुवात४ रोजी पश्चिम क्षेत्र सांस्कृती केंद्राचे पदाधिकारी, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, महापौर सीमा भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे, युनियन बँक आॅफ इंडियाचे महाव्यवस्थापक एच.सी. मित्तल, सह व्यवस्थापक डॉ. अजित मराठे, स्टेट बँक आॅफ इंडियाचे शाखा प्रबंधक अशोक सोनुने आदी उपस्थित राहणार आहे. उद्घाटन समारंभानंतर लगेच पहिल्या सत्रास सुरुवात होणार आहे. खाजगी वाहिनीवरून आपल्या आवाजाने सर्वांना भूरळ घालणाºया मोहंमद अमान यांच्या गायानाने महोत्सवाचा शुभारंभ होईल. त्यानंंतर बासरी वादक पं. प्रवीण घोडखिंडी यांचे बासरी वादन होईल.५ जानेवारी रोजी सनई वादक पं. गजानन साळुंखे यांच्या सनई वादनाने दुसºया दिवसाच्या पहिल्या सत्रास सुरुवात होईल. यामध्ये पंडित साळुंखे हे शास्त्रीय, उपशास्त्रीय व नाट्यगीत सादर करणार आहे. दुसºया सत्रास कथक नृत्यकार दीपक महाराज हे कथक नृत्याचा अविष्कार सादर करणार आहे.प्रात:काली गुंजणार शास्त्रीय गायन६ जानेवारी रोजी महात्मा गांधी उद्यानात प्रसिद्ध शास्त्रीय, उपशास्त्रीय गायक गायक व खाजगी वाहिनीवरील गायन स्पर्धेतील विजेते अनिरुद्ध जोशी यांची सकाळी ७ ते ९ या वेळेत गायन सादर करणार आहे.संध्याकाळच्या सत्रात युवा कलावंत वाराणसीचे (बनारस) रोहीत मिश्रा, व राहुल मिश्रा हे ठुमरी, दादरा व टप्पा सादर करणार आहे.विदेशी कलावंताचा सहभागयंदा नवोदीत कलावंतांसह दिग्गज कलावंत महोत्सवात रंग तर भरणाच आहे, सोबतच जपानमधील कलावंत व सध्या मुंबईत राहत असलेले ताका हिरो अराई हे आपल्या संतूर वादनाने महोत्सवाचा समारोप करणार आहेत.महोत्सवाचे सूत्रसंचालन अभिनेत्री व निवेदक दीप्ती बर्वे -भागवत या करणार आहेत.
जळगावात होणाऱ्या बालगंधर्व संगीत महोत्सवात विदेशी कलावंत छेडणार तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:19 PM
४ ते ६ जानेवारी दरम्यान संगीत मेजवानी
ठळक मुद्देस्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे आयोजनसात सत्रामध्ये महोत्सव