ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.23- राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल्ल याच्यासह त्याच्या लहान भाऊ बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी भुसावळ रेल्वे स्थानकावर पोस्टर्स लावण्यात आले आहे. वनविभागाच्या हद्दीत शोध मोहिम राबवली जात आहे मात्र त्यानंतरी पथकाला दिलासा मिळालेला नाही़
नीलेश हा त्याचा लहान भाऊ गणपत (वय 7) हा 18 पासून बेपत्ता झाले असून तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक वंदना सोनुने यांनी शोधासाठी मोठय़ा प्रमाणात व्यापक मोहीम हाती घेतली आह़े पथकात जवळपास 20 कर्मचा:यांचा समावेश आहे. सुरूवातीला श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. 21 व 22 तारखेला स्वत: पोलीस उपनिरीक्षक वंदना सोनुने व पथकाने भुसावळ येथील रेल्वे स्टेशन ला जाऊन संपूर्ण स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच बस स्थानक व स्टेशन परिसरात पोस्टर लावण्यात आले आहेत. 23 रोजी सकाळपासून मलकापूर स्टेशन व स्टॅण्डवर तपासणीसाठी पथक पाठवले आहे. 22 रोजी दिवसभर मुक्ताईनगर उपविभागातीळ वनहद्दीत दोन वन कर्मचा:यांसह चार पोलीस कर्मचा:यांनी माळेगाव, कुरंगी, उजनी,व साळशिंगी वनात जाऊन नीलेशसाठी पूर्ण रान पिंजून काढण्यात आल़े