ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव : दि. 12 - नरभक्षक बिबटय़ाच्या हल्ल्यात महिन्याभरात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. वनविभागाला बिबटय़ाला जेरबंद करण्यात अपयश आल्याने पिलखोड, सायगाव, उंबरखेड परिसरात भीतीचा थरार कायम आहे. सोमवारी बिबटय़ाने झडप घालून उंबरखेड येथील आणि पिंपळवाड म्हाळसा शिवारातील शेतीत काम करणा:या अलकाबाई गणपत अहिरे या 48 वर्षीय महिलेला ठार केले. हल्ला इतका तीव्र होता की, ही महिला जागीच ठार झाली. महिन्याभरात बिबटय़ाने सातत्याने दर्शन देत हल्लेही केले आहेत. सुरुवातीला गुरांचा घास घेणा-या बिबट्याने आता शेतात काम करणा:यांना लक्ष केले आहे. उंबरखेड गिरणा नदीपात्राजवळील हर्षल चव्हाण आठ या वर्षीय मुलाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला आहे. यापूर्वीही बिबटय़ाने आठ ते दहा बक:या, बोकड आदींचा फडशा पाडला आहे. वनविभाग सुस्तचगेल्या काही महिन्यापासून मन्याड पटय़ात बिबटय़ाने आपला तळ ठोकला असून, सातत्याने तो हल्ले करीत आहे. वनविभागाला बिबटय़ाला पकडण्यात अपयश आले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरणही कायम आहे. ऊसात निवारा मन्याड व गिरणा परिसरात शेतांमध्ये मोठय़ा प्रमाणात ऊस उभा आहे. याच उंच वाढलेल्या ऊसात बिबटय़ा दबा धरुन बसतो. शेतात काम करणा:या एकटय़ा-दुकटय़ा सावजाला हेरुन आपले काम फत्ते करतो. परिसरात शेतात कामाला जाण्यासाठी मजूर आणि शेतकरी घाबरत आहे. सायगाव येथेही गेल्या महिन्यात बिबटय़ाने तीन महिलांवर हल्ला केला. यात दोघी गंभीर जखमी झाल्या आहे.
उपवनसंरक्षकांची घटनास्थळाची पाहणी जळगाव विभागाचे उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्यासह सहाय्यक वनसंरक्षक एन.ए. पाटील, एस. आर. पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. वनविभागाच्या कर्मचा:यांना सूचनाही केल्या. दरम्यान वनविभागाने पिंपळवाडा म्हाळसा परिसरात बिबटय़ाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची तयारी सुरू केली आहे. पिलखोड परिसरात यापूर्वीच पिंजरा लावण्यात आला असून परिसरात खबरदारी घ्यावयाच्या सूचनांची छापील पत्रकेही वाटल्याची माहिती चाळीसगाव वनविभागाचे संजय मोरे यांनी दिली.