ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 29 - चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणा:या नरभक्षक बिबटय़ाला रोखण्यासाठी सवरेतोपरी प्रयत्न सुरू असून यासाठी नागरिकांना दिलेल्या सूचनांचे त्यांनी पाहणी केले आणि सतर्क राहणे आवश्यक असल्याचे मत वन्यप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. इतकेच नव्हे हिंस्त्र प्राणी कोणत्या ठिकाणी आहे, या बाबत वन विभागाच्या अधिकारी, कर्मचा:यांनी माहिती ठेवणेही गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तसेच जंगलामध्ये मानवी हस्तक्षेप रोखणे काळाजी गरज असल्याचे काही जणांनी सांगितले. चाळीसगाव तालुक्यात बिबटय़ाचा धुमाकूळ वाढतच असून मंगळवारी पहाटे त्याने सहावा बळी घेतला. यापूर्वीच संतप्त झालेल्या नागरिकांच्या संतापामध्ये या घटनेने पुन्हा भर घातली असून प्रशासनास या रोषास सामोरे जावे लागत आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर वन्यप्रेमी, निवृत्त वन अधिकारी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता वरील सूर उमटला.
अधिकारी, कर्मचा-यांनी जागृत रहावेकोणतीही घटना झाल्यानंतर उपाययोजनांना वेग येतो, मात्र त्यापूर्वीच ती कशी रोखता येईल, याबाबत सतर्क राहिले तर घटना टाळता येतात. त्यासाठी वनांमध्ये हिंस्त्र प्राणी कोठे आहे, याची माहिती वन विभागाच्या अधिकारी, कर्मचा:यांनी ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्राण्यांचा शोध घेण्यास मदत होते, असे मत निवृत्त वन अधिकारी सु.सु. पाटील यांनी व्यक्त केले.
सहकार्य आवश्यकबिबटय़ाचा शोध सुरू आहे. मात्र याबाबत नागरिकांनी बाहेर झोपू नये, उघडय़ावर शौचास जावू नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहे, त्यांचे पालन करावे. पशूधन उघडय़ावर बांधल्यास पिंज:यातील भक्षाकडे बिबटय़ा येत नाही, त्यामुळे पशूधन बंदीस्त भागात ठेवणे व इतर बाबतीतही नागरिकांनी सतर्क राहून सहकार्य करावे, अशी अपेक्षा मानद वन्य जीव संरक्षक राजेश ठोंबरे यांनी व्यक्त केली.
अधिवास जपला जावाजंगल तोड मोठय़ा प्रमाणात वाढल्याने प्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे. प्राण्यांचे भक्ष, आसरा नष्ट होत असल्याने त्यांचा अधिवास धोक्यात येऊन अशा घटना वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी याचा विचार करीत जंगलांमधील मानवी हस्तक्षेप रोखला पाहिजे, असे मत वन्यजीव अभ्यासक अभय उजागरे यांनी व्यक्त केले.
उपाययोजनांना वेगबिबटय़ाला पकडण्यासाठी कॅमेरे बसविण्यात आले असून पिंजरेही वाढविण्यात आले आहे. बिबटय़ाला रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनीही सतर्क रहावे, असे आवाहन वन्य जीव अभ्यासक विवेक देसाई यांनी केले.