चाळीसगाव : शहरातून वाहणा:या नदीत घाणीचे साम्राज्य वाढल्याने या नदीला नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्या धोक्यात आले आहे. पालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत खान्देश जन आंदोलन समितीनेही निवेदनाद्वारे लक्ष वेधले असून या निवेदनात नमूद केले आहे की,स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून नगरपरिषदेला करोडो रुपयाचा निधी मिळत आहे. मात्र नगरपालिका कागदोपत्री स्वच्छता दाखवत आहे. शहराच्या मध्यभागी वाहणा:या तितूर व डोंगरी नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात कचरा साचून आहे. त्यामुळे या नद्यांना गटारीचे स्वरुप मिळाले आहे. अनेक गटारींचे पाणीही या नद्यामध्ये सोडले आहे. नदीपात्रातील साचलेल्या प्लास्टीक व इतर कच:यामुळे पाणी तुंबून दरुगधी सुटली आहे. परिणामी परिसात डासांचे प्रमाणही वाढले आहे. अनेक शाळा या नदीपलीकडे असल्याने विद्याथ्र्याना नदीपात्राच्या पलीकडे ये-जा करावे लागते. त्यांना या घाणीचा सामना दररोज करावा लागत आहे. नागरिकांचे व विद्याथ्र्याचे आरोग्यही धोक्यात आले आहे. नदीपात्रावरील पुलावर अनेक दुकाने थाटली असून हे दुकानदार दुकानातील कचरा, भाजीपाला नदीापत्रात फेकतात. या व्यावसायिकांना कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी जेणेकरुन ते कचरा नदीपात्रात टाकणार नाही. अनेकदा कच:याचे ढीग उचलले न गेल्याने या कच:यास पेटवून दिले जाते. या धुराचा त्रास नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर होत आहे. (वार्ताहर)
तितूर नदीला आले नाल्याचे स्वरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 12:10 AM