पारोळा- माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांना दोन दिवसांपूर्वी त्रास जाणवू लागल्याने त्यांची अँटीजन चाचणी तातडीने करण्यात आली व त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले असून औषधोपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती ठीक आहे. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जे कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत, त्या सर्वांनी काळजी घ्यावी. व कोरोनाची चाचणी करून घ्यावी. बालाजी महाराज व जनतेच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून पुन्हा जनसेवेचे घेतलेले व्रत सुरू करेल अशा भावना त्यांनी बोलून दाखविल्या.
माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांना कोरोनाचा संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 7:20 PM