शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या बहिणीचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 6:59 PM

पाळधी जवळील दुर्घटना :मोटरसायकलस्वारही ठार

पाळधी, ता.धरणगाव : जळगावकडून एरंडोलकडे जाणाऱ्या चारचाकीचे मागील टायर फुटल्याने झालेल्या अपघातात रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी प्रा. स्नेहजा प्रेमानंद रुपवते (वय ६५) यांचा मृत्यू झाला. गाडीचे टायर फुटल्याने समोरून येणाºया मोटारसायकलस्वारास जबर धडक बसली. यामुळे मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला.स्नेहजा रुपवते या विधानसभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या कन्या होत. त्या खिरोदा येथे भाचीचे लग्न आटोपून नातेवाईकांसोबत मुंबईकडे घरी जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. १२ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव पासून जवळच पाळधी बायपासवतर एमएसईबी कार्यालयाजवळ हा अपघात झाला.जळगावकडून एरंडोलकडे जाणारी चारचाकी (एम.एच.४६ पी.९०५८) ही वळण रस्त्यावर आली असता या गाडीचे मागील दोन्ही टायर फुटल्याने गाडी चालकाचे नियंत्रण सुटले व महामार्गावर पाच ते सहा पलट्या घेतल्याने त्यातील सात जण जखमी झाले. या दरम्यान एरंडोलकडून जळगावकडे जाणाºया मोटारसायकलला (एम.एच.१९ बी.डब्लू.६८४५) जबर धडक दिली. मोटारसायकलस्वार हा रस्त्याच्याकडेला फेकला जाऊन जागीच ठार झाला. हा अपघात इतका गंभीर होता की, दोन्ही गाड्या सुमारे ५० ते ६० फुटापर्यंत फेकल्या गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.अपघात झाला तेव्हा एरंडोल येथील कृष्णा हॉटेलचे मालक कृष्णा पिंताबर ठाकरे हे आपल्या वाहनाने जळगावकडे जात होते. त्यांनी आपल्या गाडीतील लोकांना तेथेच उतरवून जखमींना जळगावला पुढील उपचारासाठी नेले. तर याचवेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या रूग्णवाहिकेतून बाकी जखमींना जळगाव येथे हलविण्यत आले.अपघाताची बातमी कळताच घटनास्थळी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी धाव घेऊन मदतकार्य केले. दरम्यान, अपघातामुळे वाहतूक अर्धा तास विस्कळीत झाली होती. नंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांनी यश मिळाले.

टॅग्स :Accidentअपघात