चोपडा : अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर अकुलखेडा गावानजीक सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अनावश्यक गतिरोधक टाकण्यात आलेला आहे. या गतिरोधकामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर अवजड वाहनांसह छोटय़ा-मोठय़ा वाहनांची सारखी वर्दळ असते. गावानजीक वाहनांची गती कमी व्हावी, अपघात होऊ नये म्हणून वर्दळीच्या रस्त्यावर गतिरोधक टाकण्यात येत असतात. गतिरोधकामुळे अपघात कमी होतात असे इतरत्र चित्र असले तरी, याच्या उलट स्थिती अकुलखेडा गावानजीक आढळते. अकुलखेडा बसस्थानकापासून चोपडय़ाकडे येणा:या रस्त्यावर 700 ते 800 मीटर अंतरावर गतिरोधक टाकण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे हा गतिरोधक एका मोठय़ा झाडाजवळच टाकण्यात आलेला आहे. झाडाच्या सावलीमुळे तो वाहनचालकाला दिसत नाही. गतिरोधक आल्यावर वाहनचालक एकदम ब्रेक लावतो. त्यामुळे वाहन थांबते. त्यामागचे वाहन पुढच्या वाहनावर आदळते. या गतिरोधकामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढलेले आहे. 28 एप्रिल रोजीही डंपर आणि एका चारचाकी गाडीचा अपघात झाला होता. त्याबाबतची बातमी ‘लोकमत’ने 29 च्या अंकात प्रसिद्ध केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.गतिरोधक टाकल्याने ही जागा अपघातग्रस्त ठरत आहे. सोमवारी सकाळी माजी आमदार कैलास पाटील यांच्या चारचाकीलाही (क्र.एमएच-बीक्यू 1008) याच ठिकाणी अपघात झाला. सुदैवाने पाटील बालंबाल वाचले आहेत. पाठीमागून येणा:या गाडीने कारला धडक दिल्याने गाडीचा मागचा भाग दाबला गेला आहे. या जीवघेण्या गतिरोधकाबाबत संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. गतिरोधक टाकण्यास कोणाचा विरोध नाही. मात्र गतिरोधक टाकल्यावर त्याचे नियम पाळणेही तेवढेच गरजेचे असते. एकतर ज्या ठिकाणी गतिरोधक टाकलेला आहे, त्याच्या थोडय़ा अंतरावर त्याची सूचना देणारा फलक लावण्याची आवश्यकता आहे.4मात्र अकुलखेडा येथे टाकण्यात आलेल्या गतिरोधकालगत कुठलाच खुणेचा फलक लावलेला नाही. त्यामुळे वाहनधारकाला गतिरोधक असल्याचे ते लक्षात येत नाही. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देणार का? असा प्रश्न वाहनधारक उपस्थित करू लागले आहेत.अकुलखेडा गावानजीक असलेल्या गतिरोधकामुळे माङया गाडीला अपघात झाला. त्यातून मी बालंबाल वाचलो आहे. हा गतिरोधक काढण्याबाबत बांधकाम विभागातील उपअभियंता व संबंधित सहायक अभियंता यांना सूचना केल्या आहेत. - कैलास पाटील,माजी आमदार चोपडा
माजी आमदार अपघातात बचावले
By admin | Published: April 04, 2017 1:15 AM