चाळीसगाव: जामडीतील कोरोनाबाधित ५५ वर्षीय महिलेच्या संर्पकात आलेल्या १६ संशयितांचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले असून ही आनंद लहर अल्पावधीतच शमली. बुधवारी कोरोना बाधितांच्या संर्पकात आलेल्या १३ संशयितांना भडगावरोडस्थित कोविड केअर सेन्टर मध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.दरम्यान नव्या संशयितांपैकी काही सीमेपलिकडूनच चाळीसगावात आल्याने सीमेवरील मानवी लिकेज थांबतांना दिसत नाही. सीमाबंदी नावालाच आहे. असा तीव्र संतप्त सूर नागरिकांमध्ये उमटत आहे. दुपारी २ वाजता १३ संशयितांचे स्व?ब तपासणीसाठी घेऊन धुळे येथे पाठविण्यात आल्याची माहिती डॉ.बी.पी.बाविस्कर यांनी दिली.मूळ मालेगाव येथील वृद्ध दाम्पत्य तळेगावी आपल्या लेकीच्या भेटीसाठी आले होते. त्यांची औरंगाबाद येथे कोरोना टेस्ट घेतली असता पाझिटीव्ह आली. त्यांच्या संर्पकातील तळेगाव येथील चार संशयितांसह भडगाव येथे कोरोनाबाधिताच्या अंत्ययात्रेसाठी गेलेले बहाळ येथील चार तर कन्नड चेकपोस्टवरील चार महामार्ग पोलिस व मुंबई येथे कोरोना बाधिताच्या संर्पकात आलेला एक पोलिस कर्मचारी. अशा १३ संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तपासणीसाठी त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहे. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे उपस्थित होते. दरम्यान जामडी येथील १६ संशयितांना १४ दिवस काळजी घेण्याच्या सुचना घेऊन बुधवारी घरी सोडण्यात आले.
चाळीसगावी १३ नवे संशयित क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 3:45 PM