आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२ -पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात एसआयटीने पुण्यातील चिंचवड भागातून अमोल काळे उर्फ भाईसाहेब याला शनिवारी अटक केली. धर्माच्या नावाने कडवेपणा रुजविणाऱ्या सनात भारत संस्थेचे संस्थापक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ.जयंत आठवले यांना अटक करावी अशी मागणी अंनिसचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी नूतन मराठा महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.शनिवारी दुपारी २ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेस प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, राज्य सरचिटणीस डॉ.ठकसेण गोराणे, विनायक साळवे, राज्य व्यसनमुक्ती मंचचे सदस्य नवल ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, विश्वजीत चौधरी उपस्थित होते.डॉ.जयंत आठवले यांना अटक करापत्रकार गौरी लंकेश, नरेंद्र दाभोलकर व विवेक पानसरे यांच्या हत्येप्रकरणात सनातन भारतशी संबधित साधकांचा सहभाग समोर येत आहे. गौरी लंकेश प्रकरणात अटकेत असलेले केटी नवीनकुमार यांच्यासोबत अमोल काळे याने बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या संस्थेचे संस्थापक डॉ.जयंत आठवले हे स्वत: मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्या माध्यमातून ते बहुजन समाजातील तरुणांची डोकी भडकवित आहेत. या तरुणांना ह्युमन बॉम्ब बनवून सोडले. त्यातून संहारकता उभी राहत आहे. त्यामुळे डॉ.जयंत आठवले यांना तत्काळ अटक करून त्यांची तज्ज्ञांमार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.जातपंचायतीला मुठमातीबाबत जनप्रबोधनप्रदेश सरचिटणीस ठकसेन गोराणे यांनी जातपंचायतीच्या संदर्भात कायदा तयार झाल्यानंतर जात पंचायतीला मुठमाती यासाठी १ मे २०१९ पर्यंत राज्यभर जनप्रबोधन करणार असल्याचे सांगितले. १ जून पासून कोकण विभागात हा उपक्रम सुरु होणार असल्याचे सांगितले. विनायक साळवे यांनी जिल्हा पातळीवरील प्रशिक्षण शिबिर, त्याचे नियोजन आणि कार्यपद्धती याबाबत माहिती दिली.व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वेक्षणमहाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवानिमित्त अंनिसतर्फे व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु आहे. त्या अंतर्गत समन्वय मंचाने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील साडे चार कोटी कुुंटुबातील किमान एक लाख व्यक्तीचा व्यसनामुळे मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी अंनिस काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सनातन भारत संस्थेच्या संस्थापकांना अटक करा : अंनिसचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 8:24 PM
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात एसआयटीने पुण्यातील चिंचवड भागातून अमोल काळे उर्फ भाईसाहेब याला शनिवारी अटक केली. धर्माच्या नावाने कडवेपणा रुजविणाऱ्या सनात भारत संस्थेचे संस्थापक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ.जयंत आठवले यांना अटक करावी अशी मागणी अंनिसचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी नूतन मराठा महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
ठळक मुद्देव्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वेक्षणजातपंचायतीला मुठमातीबाबत जनप्रबोधन२० आॅगस्ट राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिन