भुसावळ : साई निर्मल फाउंडेशन या संस्थेने ग्रामीण रुग्णालयातील कोरोना योद्ध्यांचा बुधवारी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कोरोना काळात स्वतःच्या आणि कुटुंबाचा विचार न करता काम करणाऱ्या भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर मधील कर्मचाऱ्यांना कर्मवीर पुरस्कार सन्मान पत्र आणि रामरक्षा देत सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातील ४ हजार ५५० कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले.भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. नि.तू. पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी ग्रामीण रुग्णालय अँड ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर चौधरी, डॉ. बी.एच.चाकूरकर,साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिशिर जावळे, सामाजिक कार्यकर्ते आर.के.कोळी, सतीश महाजन व्यासपीठावर होते. डॉ. नि. तू. पाटील तसेच पुरस्कारार्थी सुमन कसबे यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन चंद्रशेखर पाटील यांनी केले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी बी.एच. चाकूरकर, यांच्यासह तेथील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कर्मवीर पुरस्कार आणि रामरक्षा देऊन सन्मानित करण्यात आले.
भुसावळात साडेचार हजार कोरोना योद्ध्यांचा कर्मवीर पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 1:55 PM
साडेचार हजार कोरोना योद्ध्यांचा कर्मवीर पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
ठळक मुद्दे साई निर्मल फाउंडेशनचा उपक्रमडॉ. नि. तू. पाटील तसेच पुरस्कारार्थी सुमन कसबे यांनी व्यक्त केले मनोगत