ललित झांबरे /आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १३ - जिल्ह्यातील दोन क्रीडा संघटकांना एकाचवेळी राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याने जळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाची लहर आहे. डॉ.प्रदीप तळवेलकर आणि फारूक शेख यांना हा पुरस्कार मिळणे जवळपास निश्चित असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या क्रीडा वर्तुळात होती. त्यावर सोमवारी अधिकृत शिक्कामोर्तब झाले.जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून आता सहा जणांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय आणखी पाच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा जळगावशी संबंध आहे. याप्रकारे जिल्ह्याशी संबंधीत आतापर्यंत एकूण ११ जणांना हा पुरस्कार मिळाला आहे.डॉ.तळवेलकर आणि शेख यांच्यासह जळगाव जिल्ह्यात आता चार शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडा संघटक आहेत. त्यात अॅथलेटिक्स संघटनेचे प्रा.डॉ. नारायण खडके (२००५-०६) आणि खो-खो संघटनेचे गणपतराव पोळ (२००४-०५) यांचाही समावेश आहे.जिल्ह्यातील पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते म्हणून भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविलेले शूटींगबॉलपटू अशोक चौधरी यांची नोंद आहे. त्यांना १९९५-९६ साठी खेळाडू म्हणून हा पुरस्कार मिळाला होता हे विशेष. त्यानंतर जळगाव जिल्ह्याला खेळाडू म्हणून राज्य पुरस्कार दिव्यांग जलतरणपटू कांचन चौधरी (२०१४) हिने एकलव्य पुरस्काराच्या रूपाने मिळवून दिला होता.याशिवाय चाळीसगावचे बॅडमिंटनपटू मिलिंद घाटे, मुळची असोद्याची साहसी क्रीडापटू शीतल महाजन (पुणे) , टेबल टेनिसपटू रोहित चौधरी (पुणे), मुळच्या वर्ध्याच्या आणि रेल्वेच्या व्हॉलीबॉलपटू अंजली रहाणे-पाटील आणि जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या कॅरमपटू आयेशा मोहम्मद (ठाणे) हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते जळगाव जिल्ह्याशी संबंधीत आहेत.जळगाव जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेतेनाव खेळ वर्षमिलिंद घाटे बॅडमिंटन १९८८-८९अंजली रहाणे-पाटील व्हॉलीबॉल १९९३-९४अशोक चौधरी शूटिंगबॉल १९९५-९६रोहित चौधरी टेबल टेनिस २०००-०१आयेशा मोहम्मद कॅरम २००३-०४गणपतराव पोळ क्रीडा संघटक २००४-०५शीतल महाजन साहस २००४-०५प्रा.डॉ.नारायण खडके क्रीडा संघटक २००५-०६कांचन चौधरी जलतरण २०१३-१४फारूक शेख क्रीडा संघटक २०१४-१५डॉ.प्रदीप तळवेलकर क्रीडा संघटक २०१६-१७
चार जळगावकर आहेत गुणवंत क्रीडा संघटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 1:27 PM
संघटक चार तर खेळाडू सात
ठळक मुद्देजळगाव जिल्ह्याशी संबंधीत एकूण ११ जणांना सन्मान