आडगांव ता.चाळीसगाव : चरायला सोडलेल्या गायींना भर उन्हात पाणी न मिळाल्याने पाण्याची तहान आणि उन्हाचा तडाखा यामुळे चार गायींचा मृत्यू झाला. ही घटना १ रोजी आडगाव परिसरात घटली.येथून जवळच असलेल्या देवळी येथे बऱ्याच वर्षांपासून पोपट नगा जाधव ( काठेवाडी ) हे आपल्या नातेवाईकांसमवेत वास्तव्यास आहेत. गोपालनातून त्यांचा चरितार्थ सुरु असून नेहमी प्रमाणे आपल्या गायींना इतरत्र फिरवून चारा - पाण्याची मदत होईल या आशेने पोपट काठेवाडी हे आपल्या नातेवाईकांसमवेत १ रोजी देवळी / आडगांव शिवारात गायी चरावयास गेले असता ऐन दुपारी साडेबाराच्या दरम्यान गायींना कडक ऊंन्हाची धाप बसून गायी पाणी पिण्यासाठी सैरावैरा पळत सुटल्या.परंतु आडगांव सह परीसरात जंगलामध्ये कुठेही पाण्याचा ठावठिकाणा नसल्याने गायी पाण्यावाचून खुप व्याकूळ झाल्या, अशी माहिती आडगांव येथील शालिक पुंजाराम पाटील यांनी लोकमतशी बोलतांना दिली. गायींना भयंकर तहान लागली होती परंतु शिवारात कुठेही पाणी नसल्याने गायी एकसारख्या इकडे तिकडे पळत होत्या पाणी न मिळाल्याने माझ्यासमोर ऐक ते दोन गायी जमिनीवर कोसळल्या व काही सेकंदात त्यांनी जीव सोडला. अशाच प्रकारे थोड्या थोड्या अंतराने ऐकेक करून तीन ते चार गायी जमिनीवर कोसळल्या. हे तित्र पाहून मनात धडकी भरली. मी झपाझप गायी माझ्या गोठ्यावर दाखल केल्या. घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगीतल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले. साधारणता सव्वा दीड लाखाचे नुकसान काही सेकंदात झाल्याने पोपट काठेवाडी धक्काच बसला. दुष्काळात मोठ्या कष्टाने गायींना जगविणे ऐक जबरदस्त आव्हान समजून महागडा चारा व त्यात पाण्याचे संकट असा दुहेरी सामना करत असतांना झालेल्या घटनेने मी पूर्ण हताश झालो असे पोपट काठेवाडी याने लोकमतशी बोलतांना सांगितले व शासनाकडू मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पाण्याअभावी चार गायींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2019 10:03 PM