जळगाव : मनपाकडून २०१९-२० या आर्थिक वर्षात १५ नोव्हेंबरपर्यंत एकूण २७ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा ही वसुली ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. १५ नोव्हेंबर २०१८ मध्ये २४ कोटी रुपयांची वसुली झाली होती. दरम्यान, मार्च ३१ पर्यंत मनपासमोर उद्दिष्ट गाठण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या वसुलीचे आव्हान असून, यंदा ९० टक्क्यापर्यंत वसुलीचा पल्ला गाठू अशी माहिती मनपा उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांनी दिली.महापालिका प्रशासनाने यंदा वसुलीवर अधिक भर दिला असून, चारही प्रभाग समिती मिळून आतापर्यंत २७ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. दरवर्षी मनपाकडून वसुलीसाठी डिसेंबर महिन्यापासून प्रयत्न केले जातात. यावर्षी काही प्रमाणात चित्र बदललेले पहायला मिळाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ३ कोटी रुपयांची वसुली जास्त झाली आहे. अनेक वर्षांपासून मालमत्ता कर थक विणाऱ्यांना आतापासूनच नोटीस देवून त्यांच्याकडून डिसेंबरपर्यंत वसुली करण्याचे आदेश देखील उपायुक्तांनी दिले आहेत. यासाठी मोठ्या थकबाकीदारांच्या नावांची यादी तयार करण्याचे कामदेखील सुरु झालेआहे.गाळेधारकांच्या कराची रक्कम मिळून ३५ कोटींची वसुलीमनपाचे उद्दिष्ट एकूण ८० कोटीचे आहे. या उद्दीष्टामध्ये मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या मालमत्ता कराचादेखील समावेश आहे. त्याचीदेखील ११ कोटी रुपयांपर्यंतची वसुली झाल्याने वसुलीची आतापर्यंतची रक्कम ही ३५ कोटी रुपयांपर्यंत जाईल अशी माहिती उपायुक्त गुट्टे यांनी दिली.गाळेधारकांकडून कराची रक्कमदेखील थकीत होती. ती देखील यंदा वसुल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा उदिष्ट बºयापैकी पुर्ण होण्याची शक्यता आहे.३१ डिसेंबरनंतर २ टक्के शास्ती३१ डिसेंबर पर्यंत मालमत्ता कराची रक्कम भरल्यास मनपाकडून कोणताही दंड केला जात नाही. मात्र, १ जानेवारीपासून मालमत्ता करावर २ टक्के शास्ती म्हणून दंड आकारण्यात येणार असल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा बॅँक व हुडकोचे कर्ज फेडले गेल्यामुळे देखील मनपाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. हुडको कर्जापोटी जरी ३ कोटी रुपये दर महिन्याला शासनाला द्यायचे असले तरी जिल्हा बॅँकेला देण्यात येणारा १ कोटी रुपयांचा हप्ता वाचल्याने मनपाच्या खात्यात १२ कोटी रुपयांची बचत झाली आहे.
चार महिन्यात मनपासमोर ५० कोटी वसुलीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:36 PM