चाळीसगाव : गिरणा परिसरात वेगवेगळ्या चार घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. चाळीसगाव तालुक्यात तीन तर भडगाव तालुक्यात एक घटना घडली. रेल्वेखाली सापडून वृद्ध ठारचाळीसगावी धावत्या रेल्वे खाली सापडून काशीनाथ महादू कुमावत (रा. कासारी ता. नांदगाव) (वय ७६) या वृद्धाचा २ रोजी सकाळी साडेसात वाजता मृत्य झाला. ही घटना चाळीसगाव स्थानकादरम्यान घडली. अनोळखी मृतदेहचाळीसगाव येथील स्टेशन रोडवरील राष्ट्रीय महाविद्यालयाच्या भिंती लगत ४० वर्षीय अनोळखी पुरुष पडून असलेला आढळला. त्यास गणेश बाबुलाल मराठे व इतरांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी मयत घोषित केले. मयत हा भिकारी असल्याचे सांगण्यात आले. तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय पंजे करीत आहे. एकाची आत्महत्या चाळीसगाव शहरातील इच्छादेवी मंदिर परिसरातील राजेंद्र भिमराव पवार (वय २६) याने २ रोजी रात्री राहत्या घरात पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी पत्नी वैशाली हिस डबे पडल्याचा आवाज आल्याने ती उठताच ही बाब लक्षात आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेबाबत शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पंजे करीत आहे. मोटरसायकल घसरुन तरुणाचा मृत्यूकजगावकडून गोंडगावकडे वेगात धावणारी मोटरसायकल घसरुन चालकाचा मृत्यू झाला. ही घटना ३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास चिमणी वीट भट्टीजवळ घडली. याबाबत माहिती अशी की, गोकुळ एकनाथ भराडी (वय ४०, रा. दलवाडे गोंडगाव) हा आपल्या मोटरसायकलने (एम. एच. १९/ सी सी ३२१६) गोंडगावकडे जात असताना त्याची मोटरसायकल घसरुन त्याच्या डोक्यास जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. याबाबत भडगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तपास पो. हे. कॉ. भागवत पाटील करीत आहे. कार अपघातात चार जखमीकजगाव- भडगाव मार्गावर झालेल्या अपघातात चार जण जखमी झाले. २ रोजी रात्री कजगाव- भडगाव मार्गावरील बालाजी पेट्रोल पम्पा जवळ ट्रक (एम. एच. १७/ टी २०८९) व कार (एम. एच. १७/ व्ही ९७१३) यांच्यात समोरा समोर धडक झाल्याने कार मधील चार जण जखमी झाले जखमीत राहुल देवीदास पाटील (३४) , प्रमोद क्षीरसागर (३५), कृष्णा गरबड पाटील (५७) आणि भगवान अर्जून पाटील (३०,सर्व रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा) यांचा समावेश आहे. (वार्ताहर)
वेगवेगळ्या घटनेत चौघांचा मृत्यू
By admin | Published: March 04, 2017 12:50 AM