सुधीर पाटीलवरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : जिल्ह्यातील सिंचन बिगर सिंचनाकरिता महत्त्वाच्या अशा भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे चार दरवाजे रविवारी पहाटे साडेपाच वाजेला उघडण्यात आले.उन्हाळ्याच्या शेवटी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला होता. तसेच पावसाला उशिरा सुरवात झाल्याने मधल्या काळात धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत झाल्याने भयंकर जलसंकटाचा सामना करावा लागतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु उशिरा का होईना जिल्ह्यासह विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूर्णा नदीला पूर आल्याने धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. पाऊस सुरूच असल्याने पाण्याची आवक वाढत असल्याने हतनूर प्रशासने धरणाचे चार दरवाजे उघडले आहे.धरणातून चार दरवाजाद्वारे ५० क्युसेस पाणी प्रति सेकंद तापी नदीपात्रात सोडण्यास येत आहे. त्यामुळे तापी नदी खळखळून वाहू लागली आहे.सद्य:स्थितीत धरणाची जलपातळी २०८ मीटर, तर जलसाठा १४६ दशलक्ष घनमीटर एवढा आहे.बºहाणपूर येथे ११.८, तर देढतलाई येथे ४.४ मिलीमीटर पाऊस पडल्याने धरणात पाण्याची आवक वाढणार असल्याचे उपविभागीय अभियंता एन.पी.महाजन यांनी सांगितले.
हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 5:18 PM