आॅनलाइन लोकमतवाकोद, जि. जळगाव, दि. २५- जळगाव औरंगाबाद महामार्ग क्रमांक १८६ व अंजिठा घाटात सकाळी ९ वाजेच्या सुमारास सळई ने भरलेला ट्रक पलटी झाल्याने सुमारे चार ते पाच तास दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातामुळे वाकोद ते अजिंठा सुमारे १० किलोमीटर पर्यंत वाहतूक पूर्णत: ठप्प झालेली होती. वाहतूक सुरळीत करतांना अजिंठा व फर्दापूर पोलिसासह वाहतूक पोलिसांची मोठी दमछाक उडाली होती. या ट्रॅफीकमुळे हजारो वाहनांची रेलचेल थांबली होती. परिवहन मंडळाच्या अनेक बसेस अडकल्यामुळे प्रवाश्याचे प्रचंड हाल झाले.उन्हाची दाहकता सोसवेना : उंच टेकडी वर असलेल्या घाटामध्ये दुपारच्या प्रहरी कडकडत्या उन्हाच्या तीव्रतेच्या दाहकतने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. काहींनी वाहनच्या बाहेर पडून झाडाच्या सावलीचा आधार घेताना दिसत होते. लहान बालकांचे उन्हामुळे प्रचंड हाल झाले.अपघात ठिकाणी जे. सी.बी. व पोकलँड तसेच क्रेनच्या साह्याने लांब लचक असलेल्या वाहनांचे दोन भाग करून त्यातील सळई रसत्याच्या बाजूला केल्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत करण्यात आली. दुपारी १ वाजेपर्यंत वाहतूक सावरण्याचे काम सुरु होते .पिकअपसाठी दुचाकींची मोठी वर्दळ : अजिंठा ते फर्दापूर पर्यत संपूर्ण घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहने बराच वेळ थांबुन असल्याने जवळपासचे नातवाईक, मित्र कंपनीला या वर्दळीतून निघण्यासाठी बोलविले होते. या ट्रॅफीकमध्ये दुचाकी शिवाय कोणताच पर्याय नसल्यानेमोटर सायकलींची मोठी वर्दळ होती. विदेशी पर्यटकांना ही फटका : येथे जग प्रसिद्ध अजिंठा लेणी तसेच या औरंगाबाद ऐतिहासिक जिल्हा असल्याने येथे दररोज देशी विदेशी पर्यटकांची ये जा असते. या वाहतुक कोंडीचा फटका देखील विदेशी पर्यटकांना बसला.औरंगाबाद येथे इज्तेमाला जाणाºया मुस्लिम बांधवांची वाहने या ट्रॅफीकमध्ये अडकल्याने देखील मोठे हाल झाले.तसेच लग्नाची मोठी तिथी असल्याने त्याचे देखील या ठिकाणी हाल झाल्याचे दिसून आले.
अंजिठा घाटात सळईने भरलेला ट्रक उलटल्याने चार तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 1:38 PM
प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल, वाहनांच्या रांगा लागल्या
ठळक मुद्देवाहनांच्या लांबलचक रांगाप्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हालदुपारी १ वाजेपर्यंत वाहतुक सुरळीत करण्याचे प्रयत्न