वरखेडी ता. पाचोरा : भोकरी येथील सरपंच सलमाबी रशीद काकर व ग्रामपंचायत सदस्य रशीद शब्बीर काकर यांच्या लोहारी शिवारातील शेतात आग लागून पपई व केळीचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. यामुळे ते हवालदिल झाले असून नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. काकर यांची गट नं.175 व 176 मध्ये शेती असून त्यांनी येथे 52,000 केळीचे खोड लावले असून व्यापा:यासह त्यांचा सौदादेखील झालेला आहे. या केळीच्या शेताला नुकतीच दुपारी अकस्मात आग लागल्याने केळीचे 18,00 खोड व 80 नग 2:5 इंची पाईप जळाल्याने जवळजवळ साडेतीन ते चार लाखांचे नुकसान झाल्याचे रशीद शब्बीर यांनी म्हटले आहे. तलाठी जे.एस.चिंचोले व कृषी अधिकारी व्ही.जी.चौधरी यांनी पंचनामा केला. पंचनाम्यावर माजी उपसरपंच इस्माईल अ.सलाम, हैदर भिकन, लोहारी येथील संदीप भास्कर पाटील व नाना दौलत पाटील यांच्या स्वाक्ष:या आहेत. दरम्यान आगीचे कारण समजू शकले नाही. (वार्ताहर)
आगीत पिकाचे चार लाखांचे नुकसान
By admin | Published: April 24, 2017 1:15 AM