लोकमत न्यूज नेटवर्कजामनेर : पंचायत समितीची मासिक बैठक गुरुवारी झाली. यात नवीन सिंचन विहिरींच्या प्रस्तावासह गेल्या दोन वर्षातील अपूर्णावस्थेतील विहिरींच्या कामाबाबत खडाजंगी झाली. तालुक्यातील सिंचन विहिरीबाबत ग्रामस्थांच्या मोठय़ा प्रमाणात तक्रारी असून, मंजूर झालेल्यांपैकी फक्त साठ टक्केच विहिरींचे काम पूर्ण झाल्याची माहिती मिळाली, त्यामुळे सभेत यावर बरीच वादळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात 604 विहिरींना मंजुरी मिळाली होती. मात्र त्यातील फक्त साठ टक्केच विहिरींची कामे पूर्ण झाली. या विहिरींचे वाटप करताना झालेली मनमानी, आर्थिक देवाण-घेवाण यामुळे हा विषय गाजत असून यात मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.गुरुवारी झालेल्या बैठकीत एका सत्ताधारी सदस्याने नवीन सिंचन विहिरीबाबतचा विषय मांडला असता, यापूर्वीच्याच विहिरी पूर्ण होऊ शकल्या नसल्याने नवीन विहिरींना मंजुरी देता येणार नाही, असे उत्तर गटविकास अधिका:यांनी दिले.यापूर्वी विहिरींचे वाटप करताना काही ठरावीक गावातच 50 ते 60 विहिरीचे वाटप करण्यात आल्याची तक्रारही काही सदस्यांनी या वेळी केली. अपूर्णावस्थेतील विहिरींचे कामदेखील पूर्ण दाखवून बिले काढली जात असल्याची तक्रार असून याची चौकशीची मागणी सदस्यांनी केली.बैठकीस सभापती संगीताबाई पिठोडे, उपसभापती गोपाल नाईक, सदस्य रूपाली पाटील, मंदा पाटील, अमर पाटील, रमण चौधरी, पूजा भडांगे, जलाल तडवी, सुरेश बोरसे, नीता पाटील, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, कृषी अधिकारी रमेश जाधव, के.बी. पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसह चार मंत्री उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर
By admin | Published: May 19, 2017 1:02 AM