बोदवड, जि.जळगाव : येथील नगराध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण चार अर्ज दाखल झाले. यात भाजपचे दोन, तर काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी एक असे चार अर्ज दाखल झाले.बोदवडनगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कालावधी २२ जून रोजी संपत आहे. पुढील अडीच वर्षासाठी आरक्षणानुसार नामाप्र महिला राखीवपद निघाले आहे. यासाठी अध्यक्षपदाची निवडणूक २१ जून रोजी होत आहे. त्यासाठी १४ जून रोजी नामनिर्देशन करण्यासाठी शेवटच्या दिवशी चार अर्ज प्राप्त झाले.यात विद्यमान नगराध्यक्षा भाजपच्या मुमताज बी. सईद बागवान यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीकडून वंदना विजय पालवे, कांँंग्रेसकडून सुशीला आनंदा पाटील यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे.बोदवड नगरपंचायतीत भाजपचे सद्य:स्थितीत नऊ सदस्यांचे पक्षीय बलाबल आहे. १६ रोजी अर्जांची छाननी होईल. १९ रोजी माघारी नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार रवींद्र जोगी व नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक राजूसिंग चव्हाण काम पाहात आहेत.
बोदवड नगराध्यक्ष पदासाठी चार अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 6:42 PM
बोदवड येथील नगराध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण चार अर्ज दाखल झाले.
ठळक मुद्देभाजप दोन : काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी एकअर्ज दाखल करणाऱ्यात विद्यमान नगराध्यक्षांचाही समावेश