जळगाव : रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रॅक्टरवर मागून भरधाव वेगाने आलेली रिक्षा धडकल्याने रिक्षातील पाच वर्षाच्या चिमुरडीसह चार जण गंभीर जखमी झाले असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी रात्री आठ वाजता रेमंड चौकाजवळ झाला. जखमींनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रिक्षा चक्काचूरया अपघातातील जखमी रईस मोहसीन यांनी दिलेल्या माहितीनुसार कुसुंबाकडून येणाऱ्या रिक्षात (क्र.एम.एच.१९ व्ही.७३३३) पाच प्रवाशी होते. रिक्षा भरधाव वेगाने जात असताना रेमंड चौकाजवळ थांबलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रिक्षा धडकली. अपघात इतका गंभीर होता की रिक्षा चक्काचूर होऊन त्यातील चालकासह चार प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.नाकाला, डोळ्याला व तोंडाला जबर मार लागला आहे. या जखमींना रस्त्यावरील लोकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले.लातुरचे दोघं बैठकीसाठी आलेमच्छींद्र गोविंदराव गोमदे व रईस मोहसीन (रा.औसा, लातुर) हे दोन्ही जण एमआयडीसीत एका मसाल्याच्या कंपनीत बैठकीसाठी आले होते. सायंकाळी बैठक आटोपल्यानंतर ते रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी आर.एल.चौकातून या रिक्षात बसले. त्यानंतर थोड्यावेळात हा अपघात झाला.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कंपनीतील मालक व सहका-यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.हे आहेत जखमीरिक्षा चालक रिजवान निसार पटेल (वय २२, रा.फातेमा नगर, जळगाव), पवन राजू राठोड (वय २५), रोशनी पवन राठोड (वय ५) रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव व मच्छींद्र गोविंदराव गोमदे (वय ३०, रा.औसा,लातूर) असे गंभीर जखमी झाले असून रईस मोहसीन (रा.औसा, लातूर) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
जळगाव येथे थांबलेल्या ट्रॅक्टरवर धडकली रिक्षा, चिमुरडीसह चार जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:51 PM
महामार्गावर पुन्हा अपघात
ठळक मुद्देरिक्षा चक्काचूर लातुरचे दोघं बैठकीसाठी आले