आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२८ : फायनान्सद्वारे घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपयासाठी ललित विकास चौधरी (रा.लिला पार्क, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाच्या घरावर हल्ला करणा-या प्रवीण चंद्रकांत वाघ, बग्गासिंग अच्छासिंग टाक (वय २२), प्रेमसिंग अय्यासिंग टाक (वय २०) व मोनूसिंग जगदीशसिंग टाक (वय १९) सर्व रा. तांबापुरा, या चौघांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपयासाठी प्रवीण वाघ याने २५ ते ३० जणांना सोबत आणून ललित याच्या घरावर सोमवारी सायंकाळी सात वाजता हल्ला केला होता. या घटनेत मदतीसाठी आलेला राकेश प्रकाश नारखेडे (वय २३, रा.जुने जळगाव) व अभिषेक उर्फ सोनू किसन मराठे हे दोन जण गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणात १४ जणांविरुध्द कलम ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी रात्रीच धरपकड सत्र राबविले. पाच जण पोलिसांच्या हाती लागले तर अन्य जण फरार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या अभिषेक याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत तर राकेश याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील व भरत लिंगायत यांनी जखमींचे जबाब नोंदविले आहेत.
जळगावातील अयोध्या नगरात घरावर हल्ला करणा-या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 3:56 PM
फायनान्सद्वारे घेतलेल्या मोबाईलच्या हप्त्यातील शंभर रुपयासाठी ललित विकास चौधरी (रा.लिला पार्क, अयोध्या नगर, जळगाव) या तरुणाच्या घरावर हल्ला करणा-या प्रवीण चंद्रकांत वाघ, बग्गासिंग अच्छासिंग टाक (वय २२), प्रेमसिंग अय्यासिंग टाक (वय २०) व मोनूसिंग जगदीशसिंग टाक (वय १९) सर्व रा. तांबापुरा, या चौघांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.
ठळक मुद्दे९ जण फरार १४ जणांविरुध्द गुन्हा दाखलजखमीची प्रकृती चिंताजनक