आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १६ : मध्य प्रदेशातून जळगाव जिल्ह्यात येत असलेला चार लाख रुपये किमतीचा ३८ किलो गांजा, चार आरोपी व तीन दुचाकी असा ५ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी आठ वाजता अडावद-चोपडा रस्त्यावरील गुळ नदीच्या पुलावर पकडला. हा गांजा व आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासून सापळा लावला होता.अटक केलेल्यांमध्ये दिनेश सिताराम बारेला (वय २३), रबड्या सिताराम बारेला (वय २२ दोन्ही रा.कालीगुंडी, ता.वरला, जि.बडवाणी) शिवराम गिनसा पावरा उर्फ बरोडे (वय २३ रा.चाच-यापाणी, ता.वरला जि.बडवाणी) व सुरेश देवरा पावरा (वय २२ रा.गेरुघाटी, ता.वरला जि.बडवाणी) यांचा समावेश आहे. या चौघांविरुध्द चोपडा शहर पोलीस स्टेशनला अमली पदार्थाची तस्करी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वत: निरीक्षकांनीच लावला सापळामध्यप्रदेशातून यावल व चोपडामार्गे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याने पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना या भागात अधिक लक्ष केंद्रीत करुन टोळीचा पर्दाफाश करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुराडे यांनी गांजाची तस्करी केव्हा व कोणामार्फत होते याची माहिती खब-यांमार्फत काढली. ही माहिती मिळाल्यानंतर स्वत: कुराडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक सागर शिंपी, सहायक फौजदार मनोहर देशमुख, सतीश हळणोर, विनोद पाटील, अशोक चौधरी,रवींद्र गायकवाड, दत्तात्रय बडगुजर, रवींद्र चौधरी, सूरज पाटील, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, विलास पाटील, सुशील पाटील, रामचंद्र बोरसे,विनयकुमार देसले, जयंत चौधरी, शरद सुरळकर, अशोक पाटील व गफूर तडवी यांना सोबत घेऊन गुळ नदीच्या पुलावर शुक्रवारी रात्री सापळा लावला होता.एकाच वेळी आल्या तीन दुचाकीअडावदकडून चोपडाच्या दिशेने सकाळी आठ वाजता एकाच वेळी तीन दुचाकी आल्या असता निरीक्षक कुराडे यांनी त्या अडविल्या. एका दुचाकीवर दोन जण तर अन्य दोन दुचाकीवर प्रत्येकी एक जण होता व त्यांच्या मागे गोणीत १९ किलो गांजा असा ३८ किलो गांजा पकडण्यात आला. तीन दुचाकी, गांजा व चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले.