अमळनेर : बेकायदा गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे घेऊन जाताना पुण्याच्या चौघांना अमळनेर पोलिसांनी स्टेट बँकेजवल पकडून अटक केली आहे. पिस्तूल व वाहनसह साडे दहा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी २० रोजी रात्री स्टेट बँकेजवल सुनील हटकर , भटुसिह तोमर , रवी पाटील , दीपक माळी, राजेंद्र कोठावदे , विलास बागुल , मधुकर पाटील या पोलीसाना तैनात करून चारचाकी वाहन क्रमांक एम एच १२ टी डी ६७९१ हिला अडवले असता त्यात पंकज उर्फ बंटी शंकर भूमकर वय २५ रा नरेअंबेगाव जि पुणे , मनोज उर्फ मयूर भाऊसाहेब गायकवाड वय २५ रा चिखली जाधववाडी हवेली जि पुणे , ओंकार प्रकाश नाने वय २८ रा द्वारका निवास ,इंद्रायणी नगर ,भोसरी , पुणे , प्रशांत शिवाजी गुरव वय ३८ रा संत तुकाराम नगर , भोसरी पुणे हे चौघे आढळून आले त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ बेकायदा बाळगलेले , पिस्तुल , मॅगझीन तीन जिवंत काडतुसे असा एकूण ३० हजार रुपयांचे शस्त्र व १० लाख रुपये किमतीची कार , १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण १० लाख ४० हजराचा माल जप्त करून चौघांना अटक करण्यात आली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला शस्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे नेणाऱ्या पुण्यातील चार जणांना अमळनेरात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 10:17 AM