जळगाव : जिल्ह्यातील वाळू गटांचे लिलाव नुकतेच झाले होते. त्यात १३ वाळू गटांना पसंतीच मिळाली नव्हती. तर फक्त आठ गटांचे लिलाव पूर्ण झाले. त्यातील चार ठेकेदारांनी वाळू गटांची रक्कम शंभर टक्के प्रशासनाकडे जमा केली आहे. तर उरलेल्या चार ठेकेदारांनी आतापर्यंत २५ टक्के रक्कम जमा केली आहे. त्यांना ही रक्कम जमा करण्याच मुदत एक महिना आहे. उरलेल्या १३ गटांसाठी फेरनिविदा काढण्यात आली आहे. त्यांना आतापर्यंत प्रतिसादच मिळालेला नाही.
जिल्ह्यातील सर्वात मोठा वाळू गट असलेल्या भोकर गटाला देखील प्रतिसाद मिळालेला नाही. त्या गटाचीही फेर निविदा काढण्यात आली आहे. तर आधी ज्या आठ गटांचे लिलाव पूर्ण झाले त्या आठपैकी चार ठेकेदारांनी पूर्ण रक्कम भरली आहे. त्यात व्ही.के. एन्टरप्रायजेस, टाकरखेडा, सुनंदाई बिल्डर्स नारणे, ता. धरणगाव, एडकाई बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स घाडवेल, ता. चोपडा, महेश माळी उत्राण यांनी ही रक्कम पूर्ण केली आहे.
वाळू गटांना प्रतिसाद का नाही
प्रशासनाने वाळू गटांच्या लिलावाची प्रक्रिया होण्याच्या आधी पद्मालय विश्रामगृहात वाळुमध्ये ज्यांचे अर्थकारण दडले आहे. अशांची बैठक झाली होती. त्या बैठकीत ठरल्यानुसारच वाळू गटांचे लिलाव पूर्ण करण्यात आले आहे. त्यानुसार मोठ्या गटांना कुणीही प्रतिसाद दिला नाही. आता अखेर प्रशासनाने उरलेल्या १३ गटांचे फेरलिलाव २९ जानेवारीपासून सुरू केले आहेत.