शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

फायरींगला निघाले अन् पिस्तुलसह चौघे अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 1:02 PM

जळगाव : गावठी पिस्तुल व तीन जिवंत काडतूस घेऊन जंगलात फायरींगला जात असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना ...

जळगाव : गावठी पिस्तुल व तीन जिवंत काडतूस घेऊन जंगलात फायरींगला जात असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना शिरसोली येथील आकाशवाणी केंद्राच्या परिसरात रस्त्यावर पकडले. सोमवारी सकाळी १० वाजता हा प्रकार घडला.नरेश रवींद्र मराठे (२१), रवींद्र सिताराम अस्वार (२०), सागर सुधाकर पवार (२१ सर्व रा.शिरसोली) व आकाश अरुण जोशी (२४, कंवर नगर, जळगाव) अशी या अटक केलेल्या चार जणांची नावे आहेत.

शिरसोली येथील नरेश मराठे या तरुणाच्या कमरेला सतत गावठी पिस्तुल असते व ते पिस्तुल घेऊन तो त्याच्या तीन मित्रासह आकाशवाणी केंद्राकडे मोकळ्या जागेत फायरींगला जात असल्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकांना मिळाली. यानंतर आकाशवाणी केंद्राच्या परिसरात पोलिसांनी या चारही जणांना अडवले व त्यांची चौकशी केली असता पोलिसांना मिळालेल्या नावांची खात्री झाली. नरेश याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पिस्तुल व पॅँटच्या खिशात तीन जीवंत काडतूस मिळून आली.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद लाडवंजारी, राजेश मेढे, संजय हिवरकर व किरण धनगर या चार कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.पिस्तुल व काडतूस कुठून घेतल्याबाबत चौकशी केली असता आकाश जोशी याने दिल्याचे उघड झाले. हे पिस्तुल चालते की नाही याची चाचपणी करण्यासाठी आम्ही जंगलात जात होतो, असे त्यांनी तपासात सांगितले. दरम्यान, या चौघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जळगाव व भुसावळात दिवसेंदिवस गावठी पिस्तुलची तस्करी वाढत असल्याचे वारंवार होणाºया कारवायांवरुन सिध्द होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव