ऑनलाइन लोकमतनरडाणा, दि. 16 - एकाच कुटुंबातील चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याप्रकरणी म्हळसर येथील भिला चंद्रा भिल ऊर्फ अण्णा ला नरडाणा पोलिसांनी अटक केलीय.उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरु आहे.घर सोडून जाण्याची धमकी हे सामूहिक आत्महत्येमागचं कारण असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय.
शनिवारी ११ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ ते साडे नऊ वाजेच्या दरम्यान सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावरील नरडाणा रेल्वे स्टेशनपासून दीड ते दोन किमी अंतरावर तीन जणांनी रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली.नरडाणा पोलिसांना घटनास्थळी मिळून आलेल्या मोबाईलवरून आत्महत्या करणारे शिंदखेडा तालुक्यातील म्हळसर येथील एकाच कुटुंबातील असल्याचं समोर आलं.रेल्वे रुळावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडलेल्या मृतदेहां मध्ये आसाराम बभुता भिल ( ४२), शिवदास पिंटू भिल ( २१), मोठाभाऊ पिंटू भिल (१८ ), यांचा समावेश होता, तर या घटनेत अन्य दोन बेपत्ता झालेल्या महिलांचा शोध घेण्याचं काम सुरु असतांना रेल्वे रुळापासून काही अंतरावर कोरड्या असलेल्या विहरित आसाराम बभुता भिल ची पत्नी विठाबाई ३९) ही मृतावस्थेत सापडली तर १६ वर्षीय मुलगी अक्काबाई ऊर्फ वैशाली ही जखमी अवस्थेत पोलिसांना आढळून आली. अक्काबाई ऊर्फ वैशाली हिच्यावर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तिनं पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार म्हळसर येथील अण्णा ऊर्फ भिला चंद्रा भिल हा घरासमोर राहणाऱ्या ५० वर्षीय इसमाने त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांसह वडील आसाराम भिल यांना घर सोडून जाण्याची धमकी दिली होती.घर सोडून कुठे जायचं या विचाराने त्रस्त झालेल्या आसाराम ने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार शनिवारी ११ फेब्रुवारीला रेल्वे खाली आत्महत्या केली.आसारामने आपल्या घरातील सदस्यांसोबत आत्महत्या केल्याचं पाहून पत्नी विठाबाईने देखील मुलगी अक्काबाई ऊर्फ वैशाली हिला सोबत घेत विहिरीत उडी मारली,त्यात विठाबाईचा मृत्यू झाला.