भुसावळ, जि.जळगाव : पूर्व रेल्वे विभागातील पुरी रेल्वेस्थानकावर नॉन इंटरलॉकींग व यार्ड रिमोल्डींगचे कार्य १४ ते २४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. परिणामी भुसावळ विभागातून धावणाºया चार एक्सप्रेस व सुपरफास्ट रेल्वे गाड्या पुरी येथून रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या भुसावळ वाणिज्य विभागातर्फे देण्यात आली.अप दिशेतील पुरी अहमदाबाद १८४०५ एक्सप्रेस १२ व १९ सप्टेंबर, पुरी गांधीधाम १२९९४ सुफरफास्ट १७ व २४ सप्टेंबर, पुरी गांधीधाम २२९७४ सुपरफास्ट १५ व २२ सप्टेंबर तर पुरी -लोटीट १२१४६ सुपरफास्ट १८ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे.डाऊन दिशेतील अहमदाबाद पुरी १८४०६ एक्सप्रेस १४ व २१ सप्टेंबर, गांधीधाम पुरी १२९९३ सुपरफास्ट १४ व २१ सप्टेंबर, गांधीधाम-पुरी २२९७३ सुपरफास्ट १२ व १९ सप्टेंबर तर लोटीट पुरी १२१४५ सुपरफास्ट १६ सप्टेंबर रोजी रद्द राहणार असून प्रवाशांनी लक्ष देऊन गैरसोय टाळावी, असे आवाहन केले आहे.
पुरी येथे ब्लॉक, भुसावळ विभागातून धावणाऱ्या चार गाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:56 AM