जळगाव : स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने चार दुचाकी तर दोन मोबाईल चोरट्यांना शुक्रवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन दुचाकी व एक मोबाईल हस्त करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यात दुचाकी व मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने पितांबर उर्फ गोटू रतन सोनवणे (२०, रा़ रवंजे, ता. एरंडोल), दवेंद्र सुभाष घाटे (२३, रा.पहुरपेठ, ता. जामनेर), संदीप उर्फ भैय्या सूर्यभान कोळी (१९) व गोपाळ उर्फ भाऊसाहेब सुभाष पाटील (दोन्ही. रा़ चौगाव, ता. चोपडा) या दुचाकी चोरट्यांना विविध भागातून अटक केली असून त्यांच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याचसोबत पथकाला सलमान नबी पिंजारी (२४, रा. पहुर, ता.जामनेर) व समीर सत्तार पिंजारी (२१, रा. शाहुनगर) या मोबाईल चोरट्यांना सुध्दा अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एरंडोल, जिल्हापेठ व चोपडा शहर पोलीस ठाण्याती दुचाकी चोरीचे तर पहुर पोलीस ठाण्यातील मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.