एकाच जागेवर तीन वेळा धडकला ट्रक : जलसंपदाचे अधिकारी बचावलेजळगाव : राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी महामार्गावर उभारण्यात येत असलेले दुभाजक धोकादायक ठरत असून त्यामुळे सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. शनिवारी रात्री शासकीव तंत्र निकेतन, कालिंका माता, अजिंठा चौक या परिसरात अर्धवट असलेल्या दुभाजकावर ट्रक कार व इतर वाहने धडकली. कालिंका चौकाजवळ भुसावळकडून येणारी भरधाव कार दुभाजकावर धडकून तीन वेळा पलटी झाली. या कारमध्ये जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी होते, असे सांगण्यात आले. एअर बॅग उघडल्याने ते या अपघातून बचावले, कारचे मात्र नुकसान झाले होते.गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात सततधार पाऊस सुरु असल्याने हतनूर व इतर धरणांचा पाणी साठा सतत तपासला जात आहे. हा पाणी साठा तपासण्यासाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी गेले होते. तेथून परत येत असताना रात्री नऊ वाजता ही कार दुभाजकावर आदळली. त्यानंतर अजिंठा चौक व इच्छादेवी चौकाकडे येणाºया रस्त्यावर प्रत्येकी एक कार धडकली.
*तंत्रनिकेतनसमोर सतत अपघात*्रआयटीआय व शासकीय तंत्रनिकेतन समोर महामार्गावर मध्यभागी उभारण्यात आलेल्या दुभाजकावर एकाच महिन्यात तीन वेळा ट्रक व कंटेनर धडकला. ही अवजड वाहने असल्याने पलटी झाली नाहीत, मात्र त्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातांमध्ये चालकांनाही नशिबाने दुखापत झाली नाही. महामार्गावर ठिकठिकाणी मध्येच दुभाजक उभारण्यात आले आहेत तर काही ठिकाणी काम अर्धवट सोडण्यात आले आहे. वाहनधारकांना सूचना म्हणून सूचना फलक किंवा त्याआधी बॅरिकेटस् लावण्यात आलेले नाही. त्यामुळे भरधाव वाहनाला नियंत्रण मिळविणे अवघड होते.