एरंडोल : तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांनी २४ जुलै रोजी दुपारी टाकरखेडा या गावाजवळ गिरणा नदी पात्रात वाळु वाहतुक करणारे चार ट्रॅक्टर पकडले.खेतमाळीस यांन स्वत: पथकासोबत जाऊन कारवाई करीत ही वाहने एरंडोल तहसीलच्या आवारात पोलिसांच्या निगराणीत ठेवली आहेत. मात्र २५ रोजी संध्याकाळ पर्यंत महसुल विभागातर्फे कुठलाही पंचनामा झालेला नसुन सदर पंचनाम्यास विलंब का होत आहे ? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. याबाबत तहसिलदार यांना विचारणा केली असता सदर ट्रॅक्टर हे जळगाव येथील ठेकेदाराचे असल्याचे तहसिलदार यांनी सांगुन याबाबत चौकशी सुरु असल्याचे सांगितले. दरम्यान सध्या एरंडोल तहसील तालुक्यात चोरटी वाळु वाहतुक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्या अनुषंगाने हनुमंतखेडे येथील काही नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण देखील केले होते.एरंडोल शहरातून मध्यरात्री देखील सुसाट वेगाने अवैध वाळु वाहतुक करणारी वाहने जातांना दिसुन येतात. अवैध वाळु वाहतुकीला पुर्णपणे आळा बसविणे हे महसुल यंत्रणेच्या आवाक्या बाहेरची बाब आहे अशी चर्चा पर्यावरण प्रेमींमध्ये होत आहे.
अवैध वाळूची चार वाहने पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 9:16 PM