लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून रविवारी २५० नवे रुग्ण आढळून आले आहेत. चार बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या ३४१ पोहोचली आहे. मृतांमध्ये ४५ वर्षीय प्रौढाचा समावेश असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कमी वयाच्या रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे चित्र आहे.
शहरात रविवारी ४५, ७०, ७९, ८५ वर्षीय पुरुष रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, रुग्णसंख्या सातत्याने २०० पेक्षा अधिक येत असल्याचे चित्र कायम आहे. शनिवारी अँटिजनचा अहवाल नसल्याने रुग्णसंख्या १९४ नोंदविण्यात आली होती. दरम्यान, शहरातील २७८ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ३०पर्यंत नोंदविण्यात आली आहे. शहरातील पिंप्राळा, खोटेनगर या भागात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने अधिक रुग्ण समोर येत आहे. शहरातील जवळपास सर्वच भागात कमी अधिक रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाने संपूर्ण शहराला विळखा दिल्याचे चित्र आहे. शहरातील रुग्णसंख्या २०९२७ वर पोहोचली आहे. तर ग्रामीणमध्येही ५७ नवे रुग्ण आढळून आले असून या ग्रामीण भागातील रुग्णसंख्या ३३१४ झाली आहे. यात ३३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी नियमितपेक्षा आरटीपीसीआर चाचण्याही कमी झाल्या व चाचण्यांचे अहवालही कमी आले. अँटिजन चाचण्या ५२०५ झाल्या आहेत, तर ८६१ आरटीपीसीआर चाचण्या घेण्यात आल्या. ६६२ अहवाल रविवारी समोर आले. त्यात १९७ बाधित आढळून आले आहेत.
अशी आहे रुग्णांची स्थिती
सक्रिय रुग्ण : ९७०१
लक्षणे नसलेले : ७५००
लक्षणे असलेले : २२०१
पॉझिटिव्हिटी
आरटीपीसीआर : ३१.१७ टक्के
अँटिजन : १५.३१ टक्के