जळगाव : चिकन न दिल्याने राग येऊन विक्रेत्यावर कोयत्याने सपासप वार करणाºया पिंटू उर्फ संजय रामलाल गायकवाड (३४, रा. करमाड, ता.जामनेर) याला न्यायालयाने ४ वर्ष सश्रम कारावास, पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. न्या.आर.जे.कटारिया यांनी शनिवारी हा निकाल दिला.याबाबत अधिक माहिती अशी की, युनुस इस्माईल शेख (५०, रा.विटनेर, ता.जळगाव) यांचा चिकन, मटन विक्रीचा व्यवसाय आहे. २७ मार्च २०१८ रोजी युनुस व त्यांचा पुतण्या शेजाद शेख शरीफ हे करमाड, ता.जामनेर येथे व्यवसायासाठी गेले होते. सायंकाळी साडे पाच वाजता पिंटू गायकवाड हा चिकन घेण्यासाठी आला. मात्र तेव्हा कोंबड्या संपल्याने चिकन देता आले नाही,त्याचा राग आल्याने पिंटू याने घरातील कोयता आणून युनुस याच्या मानेवर, पोटावर सपासप हल्ला केला होता. तेव्हा पिराजी सोनवणे, सुभाष महाराज व अशोक महाराज यांनी भांडण सोडविले. पिराजी यांनी जखमी युनुस यांना दुचाकीवरुन पळासखेडा (मिराचे) गावापर्यंत नेले तेथून भाऊ शरीफ याने त्यांना जळगाव येथे खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथे मध्यरात्री जखमीची जबाब नोंदविल्यानंतर दुसºया दिवशी जामनेर पोलीस स्टेशनला गायकवाड याच्याविरुध्द कलम ३०७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.१२ साक्षीदार तपासलेतपासाधिकारी उपनिरीक्षक सुनील बापू कदम यांनी ३ जून २०१८ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या गुन्ह्यात सरकारतर्फे बारा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात विठ्ठल श्यामराव माळी, जखमी युनुस शेख, राजू ताराचंद शिरसाठ, सुरेश हिरालाल राजपूत, डॉ.मनोज काशिनाथ पाटील, सुभाष मोहन ठाकरे, पिराजी सोनवणे, जगनसिंग राजपूत, जगदीश गोसावी, संदीप सूर्यंवशी व तपासाधिकारी सुनील कदम यांचा समावेश आहे. या खटल्यात सुभाष ठाकरे, पिराजी सोनवणे व जगन राजपूत हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. जखमी युनुस यांना स्वत: जखमा न्यायालयात दाखल झाले. कोयत्यावरव आरोपीच्या पॅँटवर रक्ताचे डाग होते. ते युनुसचे असल्याचे निष्पन्न झाले होते. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली. आरोपीतर्फे अॅड.ज्ञानेश्वर बोरसे यांनी काम पाहिले.
चिकन विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला करणा-याला चार वर्ष कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:03 PM
चिकन न दिल्याने राग येऊन विक्रेत्यावर कोयत्याने सपासप वार करणाºया पिंटू उर्फ संजय रामलाल गायकवाड (३४, रा. करमाड, ता.जामनेर) याला न्यायालयाने ४ वर्ष सश्रम कारावास, पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. न्या.आर.जे.कटारिया यांनी शनिवारी हा निकाल दिला.
ठळक मुद्देजळगाव न्यायालयाचा निकाल अंडरट्रायल चालला खटला