सुनील पाटील जळगाव : आयपीएस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना ब्रेक लागला असून चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता ५ सप्टेंबरला बदल्यांबाबत निर्णय होणार आहे. एकीकडे आयएएस अधिका-यांच्या बदल्या होत असताना राष्ट्रवादीच्या गृहखात्यातील सुंदोपसुंदीमुळे बदल्या वारंवार रखडत आहेत.मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतरच आयएएस व आयपीएस अधिकाºयांच्या बदल्या होतात. मात्र विशिष्ट अधिकाºयासाठी होणारा आग्रह बदल्यांना अडथळा ठरत आहे. गेल्या आठवड्यात पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महानिरीक्षक, आयुक्त व पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली. त्यात त्यांनी आधी १५ आॅगस्ट आणि गणेशोत्सव बंदोबस्त महत्त्वाचा आहे. त्यामुळे बदली व बढतीची वाट न पाहता कामाला लागण्याचे आदेश दिले़ बैठकीनंतर दुसºयाच दिवशी बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना चौथ्यांदा मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 3:59 AM